IND Vs ENG: Jasprit Bumrah's WTC debut! Legendary Ashwin breaks record as wickets are taken
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळाला जात आहे. लीड्स कसोटीनंतर या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने धडाकेबाज पुनरागमन केले आहे. जसप्रीत बुमराहने लॉर्ड्स कसोटी सामन्यात ५ विकेट्स घेऊन इंग्लंड संघाची दाणादाण उडवली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे इंग्लंडला ३८७ धावांवर रोखण्यात यश आले. या कामगिरीसह बुमराहने लॉर्ड्स येथे पाच विकेट्स घेऊन परदेशात एका डावात सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणारा तो गोलंदाज बनला आहे. या सोबतच त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठी कामगिरी केली आहे. तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी एका डावात सर्वाधिक पाच विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे.
बुमराहने खेळाच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज हॅरी ब्रुकची विकेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, त्याने शुक्रवारी त्याने इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स (४४) याला आपली शिकार बनवले. त्यानंतर बुमराहने त्याच्या पुढच्या षटकात जो रूट (१०४) आणि ख्रिस वोक्स (०) यांना सलग चेंडूंवर माघारी पाठावले. लॉर्ड्सवर दुसऱ्या सत्रात जोफ्रा आर्चर (४) ला बाद करून बुमराहने आपल्या पाच विकेट्स पूर्ण केल्या.
हेही वाचा : केएल राहुलने सईद अन्वर आणि वीरेंद्र सेहवागला टाकलं मागे! सुनील गावस्कर यांच्याशी जोडलं नाव
बुमराहकडून अश्विनचा विक्रम मोडीत
भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पाच विकेट्स घेऊन, जसप्रीत बुमराहने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ३७ सामन्यांमध्ये १२ वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्याची किमया केली आहे. त्याने रविचंद्रन अश्विनचा विक्रम मोडीत काढला आहे. माजी भारतीय फिरकी गोलंदाज अश्विनने जुलै २०१९ ते डिसेंबर २०२४ या दरम्यान भारतासाठी ४१ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामने खेळले आणि ११ वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स आणि नॅथन लायन हे प्रत्येकी १०-१० वेळा पाच-विकेट घेत तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत.
कामाच्या ताणामुळे बुमराह एजबॅस्टन कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. पण बुमराहने लीड्स येथील पहिल्या कसोटीत पाच विकेट्स घेतल्या होत्या. लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ८३ धावा देत पाच विकेट्स घेऊन शानदार कामगिरी केली होत. यासह त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अश्विनच्या विक्रमाची बरोबरी साधली होती.
या पाच विकेट्ससह, बुमराहने सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये वसीम अक्रमच्या ११ पाच विकेट्स घेण्याच्या विक्रमाशी देखील बरोबरी साधली आहे. अक्रम आणि बुमराहपेक्षा जास्त पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम करणारा दुसरा कोणताही आशियाई गोलंदाजाचा नाही. आपल्या १७ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत, अक्रमने सेना देशांमध्ये ३२ कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये त्याने आ १४६ विकेट्स घेतल्या आहेत. तर बुमराहने आतापर्यंत सीना देशांमध्ये खेळल्या गेलेल्या 33 कसोटी सामन्यांमध्ये 155 विकेट्स घेतल्या आहेत.