IND vs ENG: Joe Root Express Susat! He created history by scoring a century at Lord's; He became the only batsman in the world to do so..
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या दिग्गज फलंदाज जो रूटने शतक झळकावले आहे. शतक पूर्ण करताच त्याने इतिहास रचला आहे. तो सध्याच्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज बनला आहे. या शतकासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आपले ३७ वे शतक पूर्ण केले आहे.
लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जो रूटने जसप्रीत बुमराहच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून आपले शतक पूर्ण केले. यासह, तो कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत पहिल्या ५ मध्ये सामील झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे. जो रूटने राहुल द्रविड आणि स्टीव्ह स्मिथ या दिग्गजांना देखील पिछाडीवर टाकले.
सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, रिकी पॉन्टिंग आणि कुमार संगकारा यांच्यानावावर कसोटी क्रिकेटमध्ये जो रूटपेक्षा जास्त शतके ठोकण्याचा विक्रम जमा आहे. कुमार संगकाराची कसोटीमध्ये ३८ शतके लगावली आहेत. पॉन्टिंगचे ४१, जॅक कॅलिसचे ४५ आणि सचिन तेंडुलकरचे ५१ शतके झळकावली आहेत. जो रूट ३७ व्या शतकासह पाचव्या स्थानावर पोहचला आहे. जर त्याने या मालिकेत आणखी दोन शतके झळकवण्यास यशस्वी ठरला तर तो कुमार संगकाराला मागे टाकेल.
यासह, जो रूट भारताविरुद्ध सर्वाधिक शतके करणारा खेळाडू देखील बनला आहे. त्याने भारताविरुद्ध ११ वे शतक झळकावून स्टीव्ह स्मिथची बरोबरी साधली आहे. तथापि, स्टीव्ह स्मिथने २४ सामन्यांमध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे.रूटने ३३ सामन्यांमध्ये ११ शतके झळकावली आहे. त्याच्याशिवाय गॅरी सोबर्सने भारताविरुद्ध ८ शतके लागावण्याचा पराक्रम केला आहे.
A splendid knock from Joe Root as he brings up his eighth Test century at Lord’s 👏#WTC27 #ENGvIND 📝: https://t.co/0NCkPJe9tS pic.twitter.com/QiHk4XRXfA
— ICC (@ICC) July 11, 2025
खेळाडू संघ सामन्यांची संख्या शतके (१००)
स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलिया २४ ११
जो रूट इंग्लंड ३३* ११
गॅरी सोबर्स वेस्ट इंडिज १८ ८
व्हिव्ह रिचर्ड्स वेस्ट इंडिज २८ ८
रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलिया २९ ८
भारताविरुद्धच्या शतकासह रूटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५५ शतके पूर्ण केली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांच्या बाबतीत त्याने हाशिम अमलाची बरोबरी केली असून त्याने महेल जयवर्धनेला मागे टाकले आहे. जयवर्धनेच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५४ शतके जमा आहेत.