केएल राहुल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना इंग्लंडच्या ऐतिहासिक मैदान लॉर्ड्सवर खेळला जात आहे. सामना सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणे स्वीकारले. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी इंग्लंड संघाने ४ विकेट गमावून २५१ धावा उभारल्या आहेत. त्याच वेळी, सामन्याच्या तिसऱ्या सत्रामध्ये केएल राहुल कर्णधारपद भूषवताना दिसून आला. यामागील एक मोठा खुलासा समोर आला आहे.
हेही वाचा : IND vs ENG: चालू सामन्यातच जडेजा आणि केएल राहुलमध्ये राडा; स्टंप माईकमध्ये कैद झाली मळमळ..
लॉर्ड्स मैदानावर खेळवण्यात येत असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी, शुभमन गिलच्या जागी फलंदाज केएल राहुल टीम इंडियाची धुरा सांभाळताना दिसून आला. पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात हा प्रकार घडून आला. यावेळी केएल राहुल संघातील आपल्या सहकाऱ्यांना आदेश देताना दिसला. यामागील कारण म्हणजे कर्णधार गिलची मैदानावर असलेली अनुपस्थिती आणि उपकर्णधार ऋषभ पंतचे दुखापतीमुळे जायबंदी होणे. गिल पुन्हा मैदानात परतला तेव्हा त्याने ही जबाबदारी पुन्हा स्वीकारली.
लॉर्ड्स कसोटी सामन्यात टीम इंडियाचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावव लागले. याबद्दल सांगताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हटले की, पंतच्या डाव्या हाताच्या तर्जनीला दुखापत झाल्यामुळे त्याला मैदाना बाहेर जावे लागले. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली आहे. ऋषभ पंत जखमी झाल्यानंतर ध्रुव जुरेलला यष्टीरक्षक म्हणून मैदानात उतरावे लागले.
पहिल्या दिवशी टीम इंडियाकडून गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. विशेषतः युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी याने त्यांच्या पहिल्याच षटकात दोन इंग्लिश फलंदाजांना आपले शिकार बनवले. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने बेन डकेटला यष्टीरक्षक ऋषभ पंतकडून झेलबाद केले तर नंतर त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, त्याने पुन्हा जॅक क्रॉलीला यष्टिरक्षक पंतकडून झेलबाद करून आपला दुसरा बळी बनवले.
हेही वाचा : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला जडेजा! टॉप 5 मध्ये केला प्रवेश
नितीश कुमार रेड्डी व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली. त्याच वेळी, जो रूट नाबाद ९९ धावा आणि कर्णधार बेन स्टोक्स नाबाद ३९ धावा करून क्रिजब्र उपस्थित आहेत.