IND vs ENG: KL Rahul's famous opportunity missed! Failed to break Sunil Gavaskar's record, scored 'so many' runs
IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. या मालिकेत भारताचा सलामीवीर केएल राहुलने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्याने पाच सामन्यांच्या १० डावांमध्ये एकूण ५३२ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकवली आहेत. पाचव्या कसोटी सामन्यात मात्र त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. केएल राहुलला ओव्हल कसोटी सामन्यात दोन्ही डावात फक्त २१ धावा करता आल्या आहेत. त्याने पहिल्या डावात १४ धावा आणि दुसऱ्या डावात ७ धावा केल्या आहेत. यासामन्यात त्याला एका विक्रमाने हुलकावणी दिली आहे.
भारताचा सलामीवीर केएल राहुलने दुसऱ्या डावात जर आणखी ११ धावा केल्या असत्या तर इंग्लंडविरुद्धच्या चालू मालिकेत त्याने ५४३ धावा झाल्या असत्या. यासह, त्याने इंग्लंडमध्ये मालिकेत सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या सुनील गावस्कर यांना मागे टाकले असते.परंतु, केएल राहुलला असे करण्यात यश आले नाही.
५४२ – सुनील गावस्कर, १९७९
५३२ – केएल राहुल, २०२५*
४०२ – मुरली विजय, २०१४
३६८ – रोहित शर्मा, २०२१-२२
सुनील गावस्कर यांनी १९७९ मध्ये इंग्लंडमध्ये भारतासाठी सलामीवीर म्हणून १६ सामने खेळले होते. या दरम्यान त्यांनी ११५२ धावा केल्या होत्या. त्याच वेळी, राहुलने आता सलामीवीर म्हणून १३ सामन्यांमध्ये ११२९ धावा फटकावल्या आहेत. गावस्करचा विक्रम मोडण्यासाठी त्याला दुसऱ्या डावामध्ये किमान ३१ धावांची आवश्यकता होती. परंतु दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या दुसऱ्या सत्रात २८ चेंडूत ७ धावा काढून तो बाद झाला.
हेही वाचा : IND vs ENG : यशस्वी जयस्वालने लिहिला इतिहास! ‘या’ भीम पराक्रमाला गवसणी घालणारा तो एकमेव भारतीय फलंदाज
केएल राहुलने इंग्लंडमधील १४ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ११४६ धावा काढल्या आहेत. इंग्लंडमधील त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करून एकूण १७ धावा केल्या. केएल राहुलनेआतापर्यंत इंग्लंडमध्ये १४ सामन्यांमध्ये चार शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. भारतासाठी इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम भारताच्या दिग्गज सचिन तेंडुलकरच्या नावावर जमा आहे. त्याने इंग्लंडमध्ये १७ कसोटी सामन्यांमध्ये १५७५ धावा केल्या आहेत.