अभिमन्यू ईश्वरन(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ओव्हल येथे खेळला जात, या मालिकेतील पाच सामने खेळून झाले आहेत. मालिकेत भारत १-२ असा पिछाडीवर आहे. तर मँचेस्टर कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. संपूर्ण मालिकेत भारतीय संघाने शडनार कामगिरी केली आहे. या दरम्यान काही खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागाल आहे. दुखापतग्रस्त खेळाडूच्या बदल्यात अन्य खेळाडूंना संघात संधी देण्यात अली आह. परंतु, या दरम्यान अभिमन्यू ईश्वरन संपूर्ण मालिकेत बेंचवर बसून राहावे लागले. त्याला एकाही सामन्यात अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले नाही. यावरून आता ईश्वरनच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा : IND vs ENG : जो रूट एक्सप्रेसचे ब्रेक फेल; एक एक विक्रम उध्वस्त! सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ विक्रमाला लोळवले
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग पाचव्या सामन्यातही अभिमन्यू ईश्वरनला संधी न दिल्यामुळे त्याच्या वडिलांचा संयमाचा बांध अखेर फुटला आहे. टीम मॅनेजमेंटवर नाराजी व्यक्त करत त्यांनी थेट कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अभिमन्यू ईश्वरनचा इंग्लंड दौरा संपूर्णपणे बेंचवर बसूनच गेला. पाच कसोट्यांपैकी एकाही सामन्यात त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नाही. त्याचे वडील रंगनाथन ईश्वरन यांनी सांगितलं की, मी दिवस नाही, तर तीन वर्षांपासून मुलाच्या टेस्ट डेब्यूची वाट पाहतो आहे. आता तो मानसिकदृष्ट्या थोडा खचलेला आहे.
ईश्वरनच्या वडिलांनी करुण नायरला मिळालेल्या संधीवरही नाराजी व्यक्त केली. “करुण नायर गेल्या वर्षी दुलीप किंवा ईरानी ट्रॉफीसाठी खेळलाच नाही. तरीही त्याला संघात स्थान मिळाले. चांगले आहे, त्याने ८०० धावा केल्या असतील. पण अभिमन्यूनेही काही कमी केले नव्हते.
रंगनाथन यांनी प्रश्न उपस्थित केला की. “काही खेळाडूंना फक्त आयपीएलच्या कामगिरीवरून कसोटी संघात संधी कशी मिळते? कसोटी संघासाठी निवड करताना रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि ईरानी ट्रॉफी या स्पर्धांचा विचार होणे आवश्यक आहे.” त्यांनी अभिमन्यूच्या कामगिरीचा उल्लेख करत सांगितले की, गेल्या वर्षभरात त्याने सुमारे ८६४ धावा केल्या आहेत. तो दुलीप ट्रॉफी आणि ईरानी ट्रॉफीमध्ये सातत्याने खेळला आणि उत्तम खेळ दाखवला. तरीही त्याला संधी नाकारण्यात आली.