IND vs ENG: Rishabh Pant will create history in the second Test! Virat Kohli's record in danger..
Rishabh Pant creates record in Tests : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. त्यातील पहिला सामना लीड्स येथे खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा ५ विकेट्सने पराभव केला. पहिल्या सामन्यात भारताच्या यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने शानदार कामगिरी केली. पंतने दोन्ही डावात शतकी खेळी केली. आता दुसरा कसोटी सामना २ जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळला जाईल. या सामन्यात पंतला इतियहस रचण्याची संधी असणार आहे. जर पंत एजबॅस्टन कसोटी सामन्यात शतक झळकावण्यात यशस्वी झाला तर तो विराट कोहलीला देखील मागे टाकणार आहे.
हेही वाचा : Restaurant Business : मोहम्मद सिराज आता बिझनेस पिचवर पकडणार वेग; हैदराबादमध्ये सुरू केले ‘हे’ रेस्टॉरंट..
पंतने इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात ५ शतके झळकावण्याचा विक्रम रचला आहे. तर विराट कोहली देखील इंग्लंडविरुद्ध ५ शतके करण्यात यशस्वी झाला आहे. आता जर पंतने अजून एक शतक झळकावले तर तो इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीमध्ये कोहलीला पिछाडीवर टाकेल. माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन इंग्लंडविरुद्ध ६ शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे.
जर आपण इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांबाबत सांगायच झालं तर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या बाबतीत अव्वल स्थानावर विराजमान आहेत, दोघांणी देखील इंग्लंडविरुद्ध कसोटीत प्रत्येकी ७ शतके झळकावली आहेत. याशिवाय, भारत-इंग्लंड एकूण कसोटीत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम जो रूटच्या नावावर जमा आहे. रूटने भारताविरुद्ध कसोटीत एकूण १० शतके झळकावण्याचा पराक्रम करून दाखवला आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : इंग्लंड जाळ्यात अडकणार? एजबॅस्टन कसोटीत टीम इंडियाने आखली जोरदार रणनीती; पहा Video
भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आता नव्या इनिंगला सुरवात केली आहे. त्याने आता बिझनेस पिचवर आपली नवी सुरुवात केली आहे. खरंतर, मोहम्मद सिराजने त्यांच्या शहर हैदराबादमध्ये एक रेस्टॉरंट सुरू केले आहे. सिराजने हैदराबाद शहराच्या मध्यभागी ‘जोहरफा’ नावाचे रेस्टॉरंट उघडले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सिराजच्या या नवीन रेस्टॉरंटमध्ये पर्शियन, मुघलाई आणि अरबी पदार्थ तसेच चायनीज पदार्थ चाखता येणार आहेत. तथापि, सिराजकडून आपल्या रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये हैदराबादी चवीची देखील विशेष काळजी घेण्यात आली आहे. ज्यामुळे हैदराबादच्या लोकांना हे रेस्टॉरंट खूप आवडण्याची शक्यता आहे.