फोटो सौजन्य - X (BCCI Women)
भारत विरुद्ध इंग्लड दुसऱ्या एकदिवसीय सामन्याची अहवाल : लॉर्ड्स मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड महिला संघांचा दुसरा एक दिवसीय सामना पार पडला. मुसळधार पावसामुळेच हा सामना 29 ओव्हरचा खेळविण्यात आला होता. या सामन्यात भारताच्या संघाला विजय मिळवण्यात अपयश आले आणि इंग्लंडच्या संघाने या विजयासह सहभागी मध्ये एक एक अशी बरोबरी केली आहे. पहिला सामन्यांमध्ये भारताचे संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली होती दुसऱ्या समान्यात भारताच्या संघाला विजय मिळवून मालिका जिंकण्याची संधी होती पण नाणेफेक गमावल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या हाती पहिले फलंदाजी लागली. लॉर्ड्स मैदानावर पाऊस पडल्यानंतर फलंदाजी करणे फार कठीण होऊन जाते. असंच काही भारतीय संघासोबत झाले.
लॉर्ड्सवर पुन्हा पाऊस पडल्यामुळे सामना 21 ओव्हरचाच खेळण्यात आला होता. इंग्लंडच्या संघासमोर 21 ओव्हरमध्ये 116 धावा करण्याचे लक्ष्य होते. भारताच्या संघाने सुरुवातीचे विकेट्स गमावल्यानंतर 29 ओव्हरमध्ये टीम इंडिया फक्त 143 धावा करू शकली. हे लक्ष इंग्लंडच्या संघाने सहज पार केले आणि विजय मिळवला. या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही महिला संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
भारत महिला विरुद्ध इंग्लंड महिला यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात पावसाने खेळ खराब केल्यानंतर भारतातील संघाने सुरुवातीच्या विकेट्स लवकर गमावले होते. त्यामुळे टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली. स्मृती मानधनाने चांगली खेळी खेळ खेळली पण ती संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. त्याचबरोबर दीप्ती शर्मा हिने देखील प्रभावशाली खेळली पण पावसाने खेळ खराब केला. दीप्ती शर्मा हिने 30 धावांची खेळ खेळली. तिने 24 चैनल मध्ये 30 धावा केला यामध्ये तिने दोन चौकार मारले. स्मृती मानधना हीने संघासाठी 42 धावांची केळी घ्यावी तिने या मध्ये पाच चौकार मारले. हरलीन देओल आणि अरुंधती रेड्डी यांनी सांगण्यासाठी छोटी खेळी खेळली. हरलीन देओल हिने १६ धावा केल्या तर अरुंधती रेड्डी हिने १४ धावा केल्या. याव्यतिरिक्त सर्व फलंदाज हे सिंगल डिजिटमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतले.
भारताचा संघ विकेट घेण्यामध्ये अपयशी ठरणार संघाच्या हाती फक्त दोन विकेट लागले. इंग्लंडच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर एमी जॉन्स हिने ४६ धावांची खेळी संघासाठी खेळली आणि नाबाद राहिली. यामध्ये तिने ५ चौकार मारले. तम्सिम ब्युमॉन्ट हिने संघासाठी ३४ धावा केल्या आणि स्नेह राणा हिने तिचा विकेट घेतला. इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंट हिने २१ धावा केल्या.
पुढील सामना हा 22 जुलै रोजी खेळायला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन रिव्हर साईड ग्राउंड येथे करण्यात आले आहे. मालिकेमध्ये एक एक अशी बरोबरी झाल्यानंतर आता हा सामना फारच मनोरंजक असणार आहे. त्यामुळे आता या शेवटच्या सामन्याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत, भारताच्या संघाने इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी 20 मालिकेमध्ये देखील विजय मिळवला होता.