
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Bangladesh Cricket Board’s response to BCCI : मुस्तफिजूर रहमानला आयपीएल २०२६ मधून वगळल्यानंतर वाद शिगेला पोहोचला आहे. सोशल मिडियावर सध्या याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. फक्त क्रिकेट चाहतेच नाही तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्याचबरोबर आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्ड यांच्यामध्ये देखील तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुस्तफिजूर रहमानला आयपीएल २०२६ मधून वगळल्यानंतर एक नवीन वाद निर्माण झाला आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाला क्रीडा मंत्रालयाकडून त्यांचे टी२० विश्वचषक लीग सामने भारताऐवजी श्रीलंकेत हलविण्याचे निर्देश मिळाले. त्यांनी खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव हे सामने हलविण्याच्या बांगलादेश क्रिकेटच्या धमकीला बीसीसीआयच्या एका सूत्राने आता योग्य उत्तर दिले आहे, असे म्हटले आहे की हे सांगणे सोपे आहे, परंतु तसे करणे अशक्य आहे.
क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी सोशल मीडियावर घोषणा केली की त्यांनी बीसीबीला त्यांचे विश्वचषक सामने श्रीलंकेत हलवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, “क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार म्हणून मी क्रिकेट बोर्डाला आयसीसीला सर्वकाही स्पष्ट करण्यास सांगितले आहे. बोर्डाने हे स्पष्ट करावे की जर बांगलादेशी खेळाडू कराराखाली असूनही भारतात खेळू शकत नाहीत, तर बांगलादेशी संघ विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येण्यास सुरक्षित वाटत नाही. मी बोर्डाला आयसीसीला विश्वचषक सामने भारताऐवजी श्रीलंकेत आयोजित करण्याची विनंती करण्यास सांगितले आहे.”
टी-२० विश्वचषकातील बांगलादेशचे तीन लीग स्टेज सामने कोलकाता येथे आणि एक मुंबईत खेळवण्यात येणार आहेत. एनडीटीव्हीशी बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, एक महिना आधीच स्पर्धेत बदल करणे अशक्य आहे. ते म्हणाले, “तुम्ही कोणाच्याही आवडीनुसार बदल करू शकत नाही. हे खूप कठीण काम आहे. तुम्हाला विरोधी संघांचा विचार करावा लागेल. त्यांची उड्डाणे, हॉटेल्स आणि इतर गोष्टी आधीच बुक केलेल्या आहेत. दररोज तीन सामने होतील, म्हणजे एक सामना श्रीलंकेत होईल. ब्रॉडकास्ट टीम आधीच तिथे उपस्थित असेल. त्यामुळे, हे सांगणे सोपे आहे पण करणे सोपे आहे.”
मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून काढून टाकल्यानंतर, टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी बांगलादेशच्या भारतात येण्याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी आयएएनएसला सांगितले की, “हा निर्णय फक्त आयपीएलशी संबंधित आहे. आम्ही अद्याप विश्वचषकाबद्दल चर्चा केलेली नाही. चर्चेनंतर आम्ही तपशील शेअर करू.”