IND Vs ENG: Shahid Afridi's pride will be shattered! 'This' Indian player will become the world's number-1 batsman; Read in detail..
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात २० जूनपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. साऱ्या जगाचे लक्ष या मालिकेवर राहणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघात तरुण खेळाडूंचा भरणा जास्त आहे. दुसरीकडे, इंग्लंडच्या संघात बहुतेक वरिष्ठ खेळाडूंचा समावेश असलेला दिसून येतो. त्याचबरोबर कर्णधार शुभमन गिलकडे भारतीय संघाची धुरा दिली आहे. २००७ पासून भारताला इंग्लंडच्या भूमीवर एक देखील मालिका जिंकता आलेली नाही.
या मालिकेदरम्यान सर्वांच्या नजरा तरुण फलंदाज यशस्वी जयस्वालवर खिळलेल्या असणार आहे. जयस्वालने अद्याप फारसे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नसले तरी. पण त्याने आजवर जे काही क्रिकेट खेळले आहे, त्यात त्याने त्याची प्रतिभा दाखवून दिली आहे. जयस्वालसाठी ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा तो इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत, त्याला एका खास विकरां रचण्याची संधी आहे.
यशस्वी जयस्वालने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये शानदार खेळ दाखवला आहे. आतापर्यंत त्याने एकूण १९ कसोटी सामने खेळले असून या दरम्यान त्याने ५५.८८ च्या सरासरीने एकूण १७९८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने ४ शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंडबद्दल सांगायचे झाल्यास त्याने या संघाविरुद्ध द्विशतक देखील केले आहे. यावरून जयस्वालला इंग्लिश संघाविरुद्ध खेळायला आवडते हे दिसून आले आहे.
हेही वाचा : WI vs IRE : बाप रे! ४ षटकांत ८१ धावा, टी-२० मध्ये Liam McCarthy ने केली लज्जास्पद विक्रमाची नोंद..
यशस्वी जयस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये बरेच षटकार मारले आहेत. आतापर्यंत त्याने एकूण ३९ षटकार लगावले आहेत. दुसरीकडे, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण ५० षटकार मारले आहेत. म्हणजेच, जयस्वालला शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी साधण्यासाठी केवळ ११ षटकार आणि तो मोडण्यासाठी १२ षटकारांची आवश्यकता आहे. जर जयस्वालने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १२ षटकार लगावले तर तो या बाबतीत जगातील नंबर वन फलंदाज बनणार आहे.
आयर्लंडचा उजव्या हाताचा गोलंदाज लियाम मॅकार्थीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात सुमार कामगिरी केली. यादरम्यान त्याने ४ षटकांत ८१ धावा मोजल्या आहेत. त्याच वेळी त्याला एक विकेट देखील मिळवता आलेली नाही. टी-२० क्रिकेट इतिहासात पूर्ण सदस्य संघाविरुद्ध दिलेला हा सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी २०२३ मध्ये गांबियाच्या मुसा जोबार्टेने झिम्बाब्वेविरुद्ध चार षटकांत तब्बल ९३ धावा दिल्या होत्या.