अयान राज आणि वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मीडिया)
13-year-old cricketer hits triple century : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम संपून डॉन आठवडे उलटून गेले आहेत. आरसीबीने पंजाबला ६ धावांनी पराभूतकरून पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपल नाव कोरले आहे. या हंगामात बिहरच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीची चांगलीच चर्चा झाली. त्याने आपल्या फलंदाजीने आयपीएल २०२५ मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या खेळाडूने त्याच्या कामगिरीने चांगलेच प्रभावित केले आहे. आयपीएल २०२५ मध्ये राजस्थानकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने टी-२० क्रिकेटमध्ये अनेक विक्रम देखील नोंदवले. आयपीएलमध्ये ३५ चेंडूत शतक ठोकण्याचा पराक्रम केला. अशातच आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवत आणखी एका खेळाडूने सर्वांना प्रभावीत केले आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील १३ वर्षीय क्रिकेटपटू अयान राजने स्फोटक खेळीने संपूर्ण क्रीडा जगताला हलवून सोडले आहे.
हेही वाचा : IND Vs END : ‘मला फोन करून सांगितले-तू निवृत्ती घे’, इंग्लंड मालिकेपूर्वी Karun Nair चा खळबळ उडवणारा खुलासा
जिल्हा क्रिकेट लीगमध्ये बिहारसाठी संस्कृती क्रिकेट अकादमीकडून खेळताना, अयानने ३२७ धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याने ३० षटकांच्या सामन्यात त्रिशतक झाळकावले. अयानने त्याच्या खेळी दरम्यान ४१ चौकार आणि २२ षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान अयानची शॉट सिलेक्शनची प्रतिभा सर्वांना आश्चर्यचकित करून गेली. या खेळीदरम्यान त्याने उत्तम शैलीत फलंदाजी केली. तो केवळ १३ वर्षांचा आहे. इतक्या लहान वयात अशा प्रकारची खेळी अयानच्या भविष्यासाठी सकारात्मक संकेत देणारी असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा : WI vs IRE : बाप रे! ४ षटकांत ८१ धावा, टी-२० मध्ये Liam McCarthy ने केली लज्जास्पद विक्रमाची नोंद..
अयान राजने स्फोटक पद्धतीने ३२७ धावा केल्या आहेत. त्याने २४४ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. एकूणच, अयानने ३० षटकांमध्ये १३४ चेंडूंत ३२७ धावांची खेळी केली आहे. त्याच्या डावातील बहुतेक धावा या चौकारांनी आल्या आहेत. यावरून असे दिसून येते की हा खेळाडू वैभव सूर्यवंशीप्रमाणे टी-२० क्रिकेटमध्येही खळबळ माजवू शकतो. अशी आता चर्चा होऊ लागली आहे.