लियाम मॅकार्थी(फोटो-सोशल मीडिया)
WI vs IRE : आयर्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात, आयर्लंडचा वेगवान गोलंदाज लियाम मॅकार्थीने अत्यंत सुमार कामगिरी करून नकोसा विक्रम केला आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात एक लाजिरवाणी कामगिरी केली आहे. आता तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे. याशिवाय, तो टी-२० च्या इतिहासातील सर्वात महागड्या गोलंदाजाच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहचला आहे.
कॅरिबियन फलंदाजांनी मॅकार्थीविरुद्ध खोऱ्याने धावा काढल्या आहेत. एकूणच, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी त्याला चांगलेच धुवून काढले आहे. मुख्यतः शिमरॉन हेटमायर, एविन लुईस, केसी कार्टी आणि रोमारियो शेफर्ड यांनी मॅकार्थीला चांगलेच धारेवर धरले आहे. टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत २५६ धावांचा डोंगर उभा केला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅरिबियन संघाने उभारलेली ही दुसरी मोठी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
हेही वाचा : IND Vs END : ‘मला फोन करून सांगितले-तू निवृत्ती घे’, इंग्लंड मालिकेपूर्वी Karun Nair चा खळबळ उडवणारा खुलासा
आयर्लंडचा उजव्या हाताचा गोलंदाज लियाम मॅकार्थीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात सुमार कामगिरी केली. यादरम्यान त्याने ४ षटकांत ८१ धावा मोजल्या आहेत. त्याच वेळी त्याला एक विकेट देखील मिळवता आलेली नाही. टी-२० क्रिकेट इतिहासात पूर्ण सदस्य संघाविरुद्ध दिलेला हा सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी २०२३ मध्ये गांबियाच्या मुसा जोबार्टेने झिम्बाब्वेविरुद्ध चार षटकांत तब्बल ९३ धावा दिल्या होत्या.परंतु, तो पूर्णवेळ सदस्य संघ नव्हता.
हेही वाचा : WC 2025: दोन देशात तणाव, तरीही रंगणार भारत-पाकिस्तान सामना! ICC कडून Women’s World Cup चे वेळापत्रक जाहीर
या सामन्यात मॅकार्थीने त्याच्या पहिल्या षटकातच १८ धावा दिल्या होत्या. तथापि, त्यानंतर, तो दुसऱ्या षटकात परतला तेव्हा त्याने केवळ ६ धावा दिल्या. हे त्याचे जबरदस्त पुनरागमन मानले गेले होते. परंतु, समोर उभे असलेले केसी कार्टी आणि रोमारियो शेफर्ड यांनी त्याच्या शेवटच्या १२ चेंडूत मात्र दोन चौकार आणि पाच षटकार ठोकून त्याला टी-२० चा सर्वात महागडा गोलंदाज ठरवेल. अशाप्रकारे, हा सामना मॅकार्थी कधीही विसरणार नाही.
आयसीसीकडून महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १६ जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हे वेळापत्रक जाहीर करतान म्हटले आहे की, ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत, पाकिस्तान महिला क्रिकेट संघ हायब्रिड मॉडेलवर खेळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. महिला विश्वचषक २०२५ ला यावर्षी ३० सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. स्पर्धेचा सेमीफायनल सामना २० किंवा ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अंतिम सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास तो २ तारखेला खेळवण्यात येणार आहे. यासाठी दोन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. पहिला कोलंबो आणि दुसरा बेंगळुरू येथे हा सामना होऊ शकतो.