फोटो सौजन्य – X
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या पाच सामन्याची कसोटी मालिका सुरू आहे. आतापर्यंत या कसोटी मालिकेचे तीन सामने खेळवण्यात आले आहेत. दोन सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाने विजय मिळवला आहे तर एक सामनात भारताच्या संघाला विजय मिळवण्यात यश मिळाले आहे. कसोटी मालिकेमध्ये पदार्पण करणारा साई सुदर्शन याला पहिल्या सामन्यातच संधी मिळाली होती. यामध्ये तो पहिला डावामध्ये तो शून्यावर बाद झाला होता तर दुसऱ्या डावात त्याने तीस धावांची केळी खेळून विकेट गमावली होती.
पहिला सामन्यामध्ये त्याने दोन्ही डावांमध्ये खराब कामगिरी केल्यामुळे त्याला पुढील दोन्हीही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पदार्पण सामन्यानंतर त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्याला आणखी एक संधी द्यावी असे चर्चा सुरू झाल्या आहेत. साई सुदर्शन याने झालेल्या आयपीएल 2025 मध्ये कमालीची कामगिरी गुजरात टायटन्स संघासाठी केली होती. पण तो पहिल्याच कसोटी सामन्यात फिर झाल्यामुळे त्याला पुढील सामन्यांमध्ये खेळण्याची संधी प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही.
८ वर्षांनी टीम इंडियात परतलेल्या करुण नायरबद्दल मोठे दावे केले जात होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने मोठा जुगार खेळला, परंतु त्याचा जुगार पूर्णपणे अयशस्वी झाला. करुण नायर गेल्या ६ डावात एकही अर्धशतक करू शकला नाही. लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याच्याकडून मोठी खेळी अपेक्षित होती, परंतु क्रीजवर वेळ घालवल्यानंतर तो चुकीचा शॉट खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. आता त्याच्या टीम इंडियात पुनरागमनाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पाकिस्तानची WCL 2025 ची सुरुवात विजयाने, पहिल्याच सामन्यात इंग्लंडला हरवले; मोहम्मद हाफिज चमकला
यासोबतच त्याला संघातून काढून साई सुदर्शनला संघात समाविष्ट करण्याची मागणी होत आहे, परंतु यामध्ये सर्वात मोठा प्रश्न म्हणजे गौतम गंभीर चौथ्या कसोटी सामन्यात करुण नायरला वगळणार का? तथापि, भारताचा माजी सलामीवीर डब्ल्यूव्ही रमन यांनी करुण नायरच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज करुण नायरच्या खराब कामगिरीबद्दल माजी भारतीय सलामीवीर डब्ल्यूव्ही रमन म्हणाले की करुणला भरपूर संधी देण्यात आल्या होत्या, परंतु त्याने संघ व्यवस्थापनाची निराशा केली आहे. यादरम्यान, त्यांनी एका कसोटीनंतर साई सुदर्शनला संघातून वगळण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
तो म्हणाला की सुदर्शनने तो सामना खेळायला नको होता किंवा त्याला अधिक संधी द्यायला हव्या होत्या. चेन्नईहून रेव्हस्पोर्ट्झशी बोलताना तो म्हणाला की मला वाटते की साई सुदर्शनला अधिक संधी द्यायला हव्या होत्या. एका कसोटी सामन्यात एका खेळाडूला खेळवून नंतर त्याला बेंचवर बसवण्यात काही अर्थ नाही. या कसोटी मालिकेत करुण नायरला अधिक संधी देण्यात आल्या, परंतु त्याने संघाची निराशा केली आहे. करुण नायरने तीन कसोटी सामन्यांच्या ६ डावात २१.८३ च्या सरासरीने फक्त १३१ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा सर्वोच्च धावसंख्या ४० धावा आहे. तर साई सुदर्शन त्याच्या एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता, परंतु दुसऱ्या डावात त्याने ३० धावा केल्या.