IND Vs ENG: Veterans are destroyed by Shubman Gill's speed! Prince breaks Gavaskar's record; did 'this' feat in England
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची क्रिकेट मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलच्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने या सामन्यात अनेक विक्रम देखील मोडले आहेत. तो इंग्लंडच्या भूमीवर द्विशतक करणारा पहिला कर्णधार देखील बनला आहे. यासोबतच त्याने इंग्लंडमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम देखील नोंदवला आहे. गिलने आता गावस्कर यांना मागे टाकत ही कामगिरी केली आहे.
सुनील गावस्कर यांनी १९७९ मध्ये ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध २२१ धावा केल्या होत्या. आजवर त्यांचा त्यांचा विक्रम कोणी देखील मोडू शकले नव्हते. एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलने मात्र २२२ धावा करताच गावस्करचा ४६ वर्षे जुना विक्रमाला मोडीत काढले.
हेही वाचा : शुभमन गिलने द्विशतक अन् केविन पीटरसनचे 1 वर्ष जुने ट्विट व्हायरल! काय आहे कनेक्शन?
शुभमन गिल इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई खेळाडू बनला आहे. याआधी कोणत्याही आशियाई कर्णधाराकडून इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावले गेले नव्हते. इंग्लंडमधील आशियाई कर्णधाराची सर्वोत्तम खेळी १९३ धावांची राहिली होती, जी २०११ मध्ये लॉर्ड्सवर श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानने उभारली होती. शुभमन गिल मात्र इंग्लंडमध्ये भारतासाठी द्विशतक झळकावणारा पहिला कर्णधार बनला आहे.
गिलने दुसऱ्या कसोटी सामन्यात जोश टंगच्या चेंडूवर एक सिंगल घेऊन कसोटीतील पहिले द्विशतक साकारले. गिलने ३११ चेंडूंचा सामना करत द्विशतक पूर्ण केलेया आहे. भारतासाठी द्विशतक ठोकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो एमएके पतौडी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात सामील झाला आहे. भारतासाठी कर्णधार म्हणून सात द्विशतके ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर नोंदवला गेला आहे.