फोटो सौजन्य – X
केविन पीटरसन ट्विट : टीम इंडिया सध्या इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारताच्या संघाने पहिला सामना गमावल्यानंतर दुसरा सामन्याच्या पहिल्या डावांमध्ये 587 धावा केल्या आहेत. यामध्ये मोलाचे योगदान हे भारताचा कर्णधार शुभमन गिल याचे राहिले. शुभमन गिलने भारतीय संघासाठी दुसऱ्या दिनी द्विशतक झळकावले भारताचा कर्णधाराने इंग्लंडच्या मैदानावर हा विक्रम पहिल्यांदाच केला. शुभमन गिल याने डबल सेंचुरी पूर्ण केल्यानंतर आत्ता ऑस्ट्रेलियन दिग्गज केविन पीटरसन याचे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
गिल इंग्लंडमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा भारतीय फलंदाज बनला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गिलने द्विशतक पूर्ण करताच, सोशल मीडियावर इंग्लंड संघाचा दिग्गज फलंदाज केविन पीटरसनची चर्चा सुरू झाली. त्याचे एक वर्ष जुने ट्विट खूप वेगाने व्हायरल झाले. या ट्विटचे कॅप्टन गिलशी खास कनेक्शन आहे. चला जाणून घेऊया.
AUS Vs WI 2nd Test : नंबर-1 संघ फक्त 66.5 ओव्हरमध्ये गारद! अल्जारी जोसेफने केला कहर
खरंतर, ही २०२४ सालची गोष्ट आहे, जेव्हा इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात गिल अपयशी ठरला. त्याने पहिल्या डावात २३ धावा आणि दुसऱ्या डावात शून्य धावा केल्या. त्यावेळी चाहत्यांनी गिलला खूप ट्रोल केले, ज्यामुळे नाराज केविन पीटरसनने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की गिलला थोडा वेळ द्या, तो भविष्यातील स्टार आहे. आज पीटरसनची ही भविष्यवाणी खरी ठरली आहे.
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने गिलबद्दलच्या ट्विटमध्ये लिहिले होते की, त्याला कसोटीत चमकण्यासाठी आणखी थोडा वेळ द्या, तो एक उत्तम खेळाडू म्हणून उदयास येईल. आपल्या जुन्या ट्विटमध्ये पीटरसनने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसचे उदाहरण देत लिहिले होते की, ‘पहिल्या १० कसोटी सामन्यांमध्ये जॅक कॅलिसची सरासरी फक्त २२ होती, पण नंतर तो क्रिकेट इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक बनला. शुभमन गिलला त्याची महानता जाणून घेण्यासाठी थोडा वेळ द्या.’
Remember my tweet about @ShubmanGill ? pic.twitter.com/7cGKPNxrZ4
— Kevin Pietersen🦏 (@KP24) July 3, 2025
पीटरसनचे हे ट्विट पहिल्या कसोटीनंतर आले. त्यानंतर त्या मालिकेतच गिलने चमत्कार केले. ५ सामन्यांच्या मालिकेत गिलने ५ सामन्यात ५६.५ च्या सरासरीने एकूण ४५२ धावा केल्या. यशस्वी जयस्वालनंतर तो मालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. आता एका वर्षानंतर, कर्णधार म्हणून इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या गिलने चमत्कार केले आहेत. तो सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे.