शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळवला जात आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने कर्णधार शुभमन गिलच्या २६९ धावा आणि जाडेजाच्या ८९ धावांच्या जोरावर भारताने ५८७ धावांचा डोंगर उभा केला. प्रतिउत्तरात इंग्लंड धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरली तेव्हा दिवसाच्या अखेर त्यांनी ३ गडी गमावत ७७ धावा केल्या होत्या. प्रथम फलदणजी करणाऱ्या भारताचा पहिल्या डावात चांगलाचा दबदबा दिसून आला. या कसोटी सामन्यात शुभमन गिलने कर्णधार म्हणून सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. गिलने माजी कसोटी कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधाराने सर्वाधिक वैयक्तिक धावा काढल्याचा विक्रम आता शुभमन गिलच्या नावावर जमा झाला आहे. गिलच्या आधी हा विक्रम भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने नोंदवला होता. गिलने एजबॅस्टन येथे सर्वाधिक म्हणजे २६९ धावा करून कोहलीचा विक्रम मोडला आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये पुण्यातील एमसीए स्टेडियमवर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी सामना खेळला गेला. या दरम्यान, भारताचा कर्णधार म्हणून कोहलीने २५४ धावा फटकावल्या होत्या. तर, बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या गिलने २६९ धावा काढल्या आहेत. गिलने ३८७ चेंडूंचा सामना करत २६९ धावा केल्या. या खेळीत त्याने ३० चौकार आणि ३ षटकार लगावलेया आहेत.
हेही वाचा : IND vs ENG: आज बॅट चालली तर रूट रचणार इतिहास, हे 2 मोठे विक्रम नोंदवणार नावावर
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक करणारा गिल हा ख्रिस गेल आणि रोहित शर्मा यांच्यानंतर कसोटीत द्विशतक, एकदिवसीय सामन्यात द्विशतक आणि कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणारा जगातील तिसरा खेळाडू बनला आहे. १८ जानेवारी २०२३ रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात गिलने न्यूझीलंडविरुद्ध २०८ धावांची खेळी केली होती. तसेच १ फेब्रुवारी २०२३ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात किवी संघाविरुद्ध १२६ धावा केल्या होत्या.
शुभमन गिलची २४ मे २०२५ रोजी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. तो भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये ३७ वा कर्णधार ठरला आहे. २० जून २०२५ रोजी लीड्समधील हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्ध त्याने कसोटी कर्णधार म्हणून सुरुवात केली आणि या सामन्यातील पहिल्या डावात १४७ धावा केल्या होत्या. पण त्याचा संघर्ष मात्र व्यर्थ गेला कारण भारताला ३७१ धावांच्या लक्ष्याचा बचाव करता आला नाही. परिणामी मालिकेतील पहिला सामना ५ विकेट्सने भारताला गमवावा लागला.
हेही वाचा : IND vs ENG : ‘सर जडेजा’ च्या बरोबरीला नाही कोणी! WTC मध्ये खेळाडूने रचला इतिहास