फोटो सौजन्य – Youtube
ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडचा ६ धावांनी पराभव केला आणि मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. भारताच्या विजयाचा हिरो मोहम्मद सिराज होता. त्याने दुसऱ्या डावात ५ आणि पहिल्या डावात ४ बळी घेतले. शेवटच्या दिवशी सिराजने इंग्लंडला ३५ धावाही करू दिल्या नाहीत. सामन्यानंतर कर्णधार शुभमन गिलसोबत मोहम्मद सिराज देखील पत्रकार परिषदेमध्ये आला. यादरम्यान त्याने आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या. सिराजने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल आणि ब्रेकअपमध्ये झालेल्या वेदनांबद्दलही सांगितले.
रविवारी लॉर्ड्सवर शेवटच्या चेंडूवर बाद झाल्यानंतर आणि हॅरी ब्रूकचा कॅच सोडल्यानंतर, मोहम्मद सिराजची रात्र अस्वस्थ होती. सोमवारी, तो त्याच्या नियोजित वेळेच्या दोन तास आधी उठला आणि त्याने गुगलवर ‘बिलीव्ह’ लिहिलेला क्रिस्टियानो रोनाल्डोचा फोटो शोधला आणि तो त्याच्या मोबाईल वॉलपेपरमध्ये बनवला.
India vs England मालिकेनंतर टीम इंडिया कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती
सामना जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार शुभमन आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे दोघेही पत्रकार परिषदेमध्ये आले होते. ज्यावेळी मोहम्मद सिराज आला हॅरी ब्रुक याचा कॅच सोडल्यावर त्याच्या भावना काय होतं याबद्दल विचारण्यात आले. यावेळी सिराज म्हणाला की बरेच फलंदाज हे डिफेन्सिव असतात पण हॅरी ब्रूक हा अटॅकिंग प्लेयर आहे त्यामुळे टीम इंडियाला नक्कीच महागात पडला. जर मी त्याचा कॅच पकडला असतात तर खेळ वेगळा असता, मी संगतला वरिष्ठ खेळाडू आहेत त्यामुळे मी संघाची मान खाली करू शकत नव्हतो त्यामुळे जे झाले आहे ते विसरून पुढे माझ्या संघासाठी काय करता येईल याकडे मी लक्ष क्रेद्रिंत केले.
यावर टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, सिराजने जर चो कॅच घेतला असता तर आमच्यासाठी खेळ सोपा झाला असता त्यामुळे जसा सामना आता झाला तसा झाला नसता. पण तुम्हालाही चांगला खेळ पाहायला मिळाला. यानंतर सगळे पत्रकार हे हसायला लागले आणि सिराज आणि शुभमन गिल देखील हसत होते.
मोहम्मद सिराजच्या कामगिरीवरुन असिम खान आणि तनवीर अहमद भिडले! दोघांनी काढली एकमेकांची लायकी…
शेवटच्या विकेटनंतर सिराजला त्याच्या भावनांबद्दल विचारण्यात आले तेव्हा भारतीय वेगवान गोलंदाज म्हणाला, “मी त्यावेळी खूप भावनिक होतो. दिनेश कार्तिक भाईंनी इंग्रजीत प्रश्न विचारले, त्यामुळे त्यावेळी काय बोलावे ते मला समजत नव्हते. क्रिकेट हे माझे पहिले प्रेम आहे. मी त्यासाठी काहीही करू शकतो. जेव्हा आपण सामना हरतो किंवा चांगली कामगिरी करत नाही तेव्हा मला खूप वाईट वाटते. मी लहानपणापासून आतापर्यंत क्रिकेटसाठी खूप मेहनत घेतली आहे. मला क्रिकेट आवडते आणि जेव्हा ब्रेकअप होतो तेव्हा ते नेहमीच दुःखद असते.”