
फोटो सौजन्य – X (BCCI)
रविंद्र जडेजाची धुव्वादार खेळी : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटीला सुरुवात कालपासून म्हणजेच २ जुलैपासून झाली आहे. भारताच्या संघाने २११ धावांवर ५ विकेट्स गमावल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या दिनाच्या पहिल्या सेशनमध्ये कमालीची कामगिरी करून ४०० धावा पार केल्या आहेत जे मागील सामन्यात अपुरे राहिले होते. भारताचा कर्णधार शुभमन गिल याने त्याच्या नेतृत्वात दुसऱ्याच सामन्यात धुव्वादार कामगिरी केली आणि त्याला सामन्यात साथ भारताचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा याने दिली.
मागील अनेक सामन्यामध्ये निराशाजनक कामगिरीमुळे रवींद्र जडेजाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. पण पुन्हा त्याने एकदा स्वतःला त्याच्या अनुभवाने सिद्ध केले आणि संघासाठी कठीण काळामध्ये शतक झळकावले. भारताच्या संघाने पहिला विकेट लवकर गमावला होता त्यानंतर टीम इंडियाने केएल राहुलचा विकेट पहिल्या दिनी पहिल्याच सेशनमध्ये गमावला होता त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि करुण नायर या दोघांची चांगली भागीदारी पहायला मिळाली.
या दोघांच्या खेळीने भारताचा संघाने कमालीची खेळी खेळली आणि यशस्वी जयस्वालचे १३ धावांची शतक हुकले. कालपासून रवींद्र जडेजा आणि शुभमन गिल हे दोघे भारतीय संघासाठी फलंदाजी करत आहेत. दोघांनी ५ विकेट्स गमावल्यानंतर २०१ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने ८९ धावांची धुव्वादार खेळी खेळली. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसरा कसोटी सामन्यातील दुसरा दिनाच्या पहिला सेशन संपला आहे यामध्ये भारताच्या संघाने एक विकेट गमावून 109 धावा केल्या. यामध्ये दोन्ही फलंदाजांनी कमाल ची कामगिरी केली.
End of a magnificent 89-run knock 👏 End of a fine 203-run partnership 🤝 Well played, Ravindra Jadeja 🙌 Updates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#TeamIndia | #ENGvIND | @imjadeja pic.twitter.com/aRxWl5nnGj — BCCI (@BCCI) July 3, 2025
भारताच्या संघाने दुसऱ्या दिनी दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या सेशनमध्ये आत्तापर्यंत 110 ओव्हर मध्ये सहा विकेट गमावून 419 धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजाचा विकेट गमावल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीसाठी आला आहे अजूनही भारताच्या हातात चार विकेट्स आहेत. शुभमन गिलने कमालीची कामगिरी केली आहे तो 168 धावांवर नाबाद खेळी खेळत आहे. भारताच्या संघासाठी दुसरा सेशन फार महत्वाचा असणार आहे. शुभमन गिल कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.