
IND Vs ENG: India's savior Sir Ravindra Jadeja has a chance to create history; Only 58 runs away from 'this' record in Manchester Test
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्या पाच सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेत इंग्लंड संघाने २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून फलंदाजी आघडीवर चांगली कामगिरी बघायला मिळाली. यामध्ये सर रविंद्र जडेजाचा उल्लेख करावा लागेल. त्याने सलग चार डावांमध्ये ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा हा अनुभवी अष्टपैलू खेळाडूची इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने शानदार फलंदाजी केली आहे आणि इंग्लंडच्या गोलंदाजांवर आपला दबदबा निर्माण केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जडेजाने अनेक विक्रम रचले आहेत. तो अजूनही त्याच्या नावावर आणखी एक विक्रम करू इच्छितो. मँचेस्टर कसोटीत रवींद्र जडेजाला इतिहास रचण्याची संधी आहे. त्याचे नाव सर गॅरी सोबर्ससह एका मजबूत यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : ड्यूक बॉलवरील टीका जिव्हारी! कंपनीने उचललं मोठं पाऊल; वाचा सविस्तर
जडेजाची इंग्लंडमध्ये आतापर्यंत कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने २७ डावांमध्ये ४०.९५ च्या सरासरीने ९४२ धावा फाटकावल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे.तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग चार अर्धशतके झळकावली आहेत. जडेजाच्या आधी वेस्ट इंडिजचे दिग्गज सर गॅरी सोबर्स यांनी इंग्लंडमध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे. तो एकमेव खेळाडू आहे ज्याने सहाव्या क्रमांकापासून ते अकराव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करताना १००० पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. त्याने १६ डावांमध्ये ८४ च्या सरासरीने १०९७ धावा कुठल्या आहेत. यामध्ये त्याने चार शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण करण्यापासून फक्त ५८ धावा दूर आहे. यापूर्वी, जडेजा इंग्लंडमध्ये सलग चार अर्धशतके झळकावणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, सौरव गांगुली आणि ऋषभ पंत यांनी ही कामगिरी करून दाखवली आहे. रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत ३ सामन्यांमध्ये १०९ च्या सरासरीने ३२७ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा : न्यूझीलंडला टी-२० तिरंगी मालिकेदरम्यान मोठा झटका! झिम्बाब्वे दौऱ्यातून ‘हा’ तडाखेबाज खेळाडू बाहेर
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथी कसोटी खेळली जाणार आहे. ही कसोटी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. भारताला हा सामना जिंकावाच लागणार आहे. या मलिकेत आतापर्यंत तीन कसोटी सामने खेळले गेले असून इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत भारताला मँचेस्टरमध्ये एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. भारत या कसोटीत विजय मिळवून इतिहास बदलवू शकतो.