ग्लेन फिलिप्स(फोटो-सोशल मीडिया)
Glenn Phillips out of Zimbabwe tour : झिम्बाब्वेमध्ये सद्या टी-२० तिरंगी मालिका खेळली जात आहे. या मालिकेदरम्यान न्यूझीलंडला मोठा झटका बसला आहे. न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स झिम्बाब्वे टी-२० मालिकेतून बाहेर पडल्याची बातमी समोर आली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे फिलिप्सला मालिकेतून बाहेर पडावे लागले असून हा न्यूझीलंड संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या दौऱ्यापूर्वी मेजर लीग क्रिकेटच्या अंतिम सामन्यादरम्यान फिलिप्स दुखापतग्रस्त झाला होता.
झिम्बाब्वेला पोहोचल्यानंतर, संघाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी फिलिप्सची तापसून करण्यात आली. ज्यामध्ये असे दिसून आले की, त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या दुखापतीमुळे तो केवळ मर्यादित षटकांच्या मालिकेतूनच बाहेर पडला नसून तर तो आगामी दोन कसोटी सामन्यांमधून देखील बाहेर पडला आहे. ज्यामध्ये त्याला संघात स्थान देण्यात आले होते.
ग्लेन फिलिप्सच्या जागी टिम रॉबिन्सनला कव्हर प्लेअर म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. जो झिम्बाब्वेसोबत सुरू असलेल्या टी-२० तिरंगी मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये संघासोबत असणार आहे. ग्लेन फिलिप्ससह मिच हे आणि जिमी नीशम हे देखील न्यूझीलंडला परतणार आहेत. संघ व्यवस्थापनाने अद्याप फिलिप्सच्या जागी कसोटी संघात कोण असणार याबाबत अद्याप खेळाडूची घोषणा करण्यात आली नाही.
ग्लेन फिलिप्सने एमएलसी २०२४ मध्ये वॉशिंग्टन फ्रीडमसाठी खेळताना उदत्तम कामगिरीत केली आहे. त्याने या स्पर्धेत त्याने १० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ६२ च्या सरासरीने आणि १३९.८४ च्या स्ट्राईक रेटने १८६ धावा फाटकावल्या आहेत. तथापि, अंतिम फेरीत त्याच्या संघाला एमआय न्यू यॉर्ककडून पराभूत व्हावे लागले. या वर्षी पाठीच्या दुखापतीमुळे तो त्रस्त होण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. यापूर्वी आयपीएल २०२४ मध्ये, त्याला गुजरात टायटन्ससाठी पर्याय म्हणून समाविष्ट करण्यात आले होते, परंतु दुखापतीमुळे त्याला बहुतेक सामन्यांत खेळता आले नाही.
मेजर लीग क्रिकेट दरम्यान सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सकडून खेळताना फिन अॅलनला देखील पायाची दुखापत झाली होती. तेव्हा न्यूझीलंडला आणखी एक धक्का बसला असून त्याची यापूर्वी दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. परंतु, आता तो देखील संघाबाहेर झाला आहे.
हेही वाचा : ना रोहित ना गिल! ॲडम गिलख्रिस्टच्या मते ‘हा’ खेळाडू तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील सर्वोत्तम फलंदाज
न्यूझीलंडचे नवे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ग्ले ते म्हणाले की, न फिलिप्ससारख्या प्रतिभावान खेळाडूला गमावणे निश्चितच निराशाजनक आहे. फिनप्रमाणेच, आम्हाला ग्लेनबद्दल खूप दुःख वाटत आहे आणि तो या मालिकेतून बाहेर पडणे खरोखरच खूपच खेदजनक आहे. आम्हाला माहित आहे की तो न्यूझीलंडसाठी मैदानावर उतरण्यासाठी खूप जास्त उत्साहित होता. आम्हाला आशा आहे की तो लवकरच बरा होऊन परत येईल.






