IND vs ENG: Sir Ravindraj Deja kisses the Manchester pitch! He thanked the ground on which he scored a century and avoided defeat..
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळवला गेला. भारताने पहिल्या डावात ३५८ धाव केल्या होत्या. प्रतिउत्तरात इंग्लंडने ६६९ धावांचा डोंगर उभा केला आणि ३११ धावांची आघाडी मिळवली. भारताची अवस्था वाईट असल्याचे दिसून आले. भारताने दुसऱ्या डावाची सुरवात केली तेव्हा ० धावा असताना चौथ्या दिवशी २ विकेट्स गमावल्या. त्यानंतर शुभमन गिल(१०३) आणि केएल राहुल (९०) चांगली खेळी करून भारताचा डाव सावरला त्यानंतर पाचव्या दिवशी राहुल आणि गिल लवकर बाद झाले आणि भारताची अवस्था २२२ धावांवर ४ अशी झाली. या कठीण परिस्थतीतुन सर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भारताला बाहेर काढण्याचे काम केले. या दोघांनी ३३४ चेंडूत २०३ धावांची नाबाद आणि विक्रमी अभेद्य भागीदारी रचली. या दरम्यान जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीमधील पाचवे शतक पूर्ण केले. भारताने सामना ड्रॉ करण्यात यश मिळवले. या दरम्यान रवींद्र जडेजाने मँचेस्टर खेळपट्टीचे आभार मानले. त्यासाठी त्याने खास कृती केली. जी आता चर्चेचा विषय ठरला आहे.
मँचेस्टर कसोटी अनिर्णित राखल्यानंतर, सर रवींद्र जडेजाने इंग्लंडच्या खेळाडूंशी आणि सामन्याच्या पंचांशी हस्तांदोलन केले. पण, येऊ सर्व करत असताना त्याने खेळपट्टीला स्पर्श केला आणि त्याला नमन करून ती माती हातात घेऊन ओठांनी त्याचे चुंबन घेताना दिसून आला. जडेजाचे तेच फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
हेही वाचा : IND VS ENG Test : जसप्रीत बुमराह पाचवा कसोटी सामना खेळणार? गौतम गंभीरं दिले अचूक उत्तर
आता चाहत्यांना प्रश्न पडला आहे की रवींद्र जडेजाने खेळपट्टीचे चुंबन का घेतले असावे? त्याने त्याची माती का चाखलीया असावी? तर त्यामागील उत्तर असे आहे की त्याने कठीण परिस्थितीत या खेळपट्टीवर शतक झळकावले आहे. मँचेस्टर कसोटीत, ज्या कठीण परिस्थितीत जडेजाने आपल्या फलंदाजाजीने शानदार कामगिरी केली. भारताला मँचेस्टर कसोटी वाचवायची होती. भारताला आपला पराभव टाळने जास्त महत्वाचे होते. यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि त्यापूर्वी केएल राहुल यांनी त्या दिशेने मोठे कामम केले होते, राहिलेले काम जडेजा आणि सुंदर यांनी पूर्ण केले.
मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या डावात, रवींद्र जडेजाच्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याला या काळात जीवनदान देखील मिळाले होते. जो रूटने त्याचा झेल सोडला आणि त्यानंतर जडेजाने सामनाच फिरवून टाकला. त्यानंतर रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या डावात आपल्या कसोटी कारकिर्दीमधील ५ वे शतक झळकावले. त्याने १८५ चेंडूंचा सामना करत १०७ धावा केल्या, यामध्ये त्यानं ए ३ चौकार आणि १ षटकार खेचला. या दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरसोबत ३३४ चेंडूत २०३ धावांची अभेद्य भागीरदारी केली आणि भारताला पराभावाच्या खाईतून बाहेर काढत सामना अनिर्णयीत राखला.
हेही वाचा : WTC Points Table : मँचेस्टर कसोटीनंतर कोणत्या संघाचा झाला फायदा? जाणून घ्या कोण पहिल्या स्थानावर विराजमान…
रवींद्र जडेजाने बजावलेल्या कामगिरीने भारतताचा पराभव टाळता आला. या कारणांमुळे मँचेस्टरच्या खेळपट्टीचे त्याने विशेष असे आभार मानले. कारण खेळपट्टीच्या नांदतीशिवाय काही एक शक्य नव्हते. बेन स्टोक्सनेही सामन्यानंतर म्हटले होते की, “खेळपट्टीवर असमान उसळी होती, पण ती डावखुऱ्यांसाठी नाही तर उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी होती. भारत भाग्यवान होता की सामना बरोबरीत आणण्यासाठी झगडणारे जडेजा आणि सुंदर दोघे फलंदाज हे डावखुरे होते.