फोटो सौजन्य - BCCI
भारतीय संघाची नवी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 ची सायकल सुरु झाली आहे. भारताच्या संघाने आतापर्यत झालेल्या चार सामन्यामध्ये १ सामना जिंकला आहे, तर २ सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे, एक सामन्यात सामना अनिर्णयित राहिला आहे. भारताच्या संघाने झालेल्या मॅचेस्टर कसोटी सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली. या सामन्याचा निकाल जरी अनिर्णित राहिला असला तरी इंग्लंडचा संघ मालिकेत अजूनही २-१ ने पुढे आहे. त्याच वेळी, भारतीय संघ मालिकेत जिवंत आहे. पुढील सामना हा ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. त्याआधी सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेची स्थिती कशी आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
मँचेस्टर कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत कोणताही बदल झाला नाही. दोन्ही संघांना ४-४ गुण मिळाले. भारत-इंग्लंड संघ WTC गुणतालिकेत कोणत्या स्थानावर आहेत ते आम्हाला कळवा? खरं तर, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ सायकलच्या टेबलमध्ये, इंग्लंड संघ तिसऱ्या स्थानावर आहे आणि भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे. दोघांचेही अनुक्रमे २६ आणि १६ गुण आहेत. त्याच वेळी, त्यांची गुणांची टक्केवारी अनुक्रमे ५४.१७ आणि ३३.३३ आहे.
मँचेस्टर कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर, दोन्ही संघांना प्रत्येकी ४ गुण मिळाले. भारतीय संघाचे १२ वरून १६ गुण झाले आणि इंग्लंड संघाचे २६ गुण झाले. स्लो ओव्हर रेटमुळे २ पेनल्टी पॉइंट मिळाल्याने इंग्लंड संघ दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला. ऑस्ट्रेलिया तीन सामने जिंकून ३६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि त्यांची गुणांची टक्केवारी १०० आहे. दुसरीकडे, श्रीलंका दोन सामन्यांमध्ये फक्त एका विजयासह दुसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांचे १६ गुण आहेत. त्यांची गुणांची टक्केवारी ६६.६७ आहे.
टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या शतकांच्या जोरावर, भारताने इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना अनिर्णित राखला. या सामन्यात, इंग्लडच्या संघाने नाणेफेक जिंकले होते, टीम इंडीयाने नाणेफेक गमावून पहिले फलंदाजी केल्यानंतर, टीम इंडियाने यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ३५८ धावा केल्या.
पहिल्या डावात इंग्लंडने १० विकेटच्या मोबदल्यात ६६९ धावा केल्या आणि ३११ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात चार विकेटच्या मोबदल्यात ४२५ धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला. आता मालिकेतील शेवटचा सामना ३१ जुलैपासून ओव्हल येथे खेळला जाईल.