IND vs ENG T-20 Match: England team announced for T-20 series against India! Royal comeback of 'this' star player..
IND vs ENG T-20 Match : २० जूनपासून भारतीय पुरुष संघ इंग्लंडच्या पुरुष संघाविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरवात करणार आहे. यावेळी भारतीय महिला संघही इंग्लंडच्या दौऱ्यावर असून जिथे ते इंग्लंड संघाविरुद्ध पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठी महिला संघ इंग्लंड पोहोचला आहे. दरम्यान, आता टी-२० मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे.
टीम इंडियाच्या संघाची आधीच घोषणा करण्यात आली आहे. तर आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने १३ जून रोजी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर केला आहे. इंग्लंडच्या महिला संघाबद्दल संज्ञाचे झाल्यास स्टार अष्टपैलू सोफी एक्लेस्टोनचा संघात पुन्हा परतली आहे. जी सध्या क्रिकेटपासून लांब होती.
तसेच, या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज लॉरेन फिलरलाही इंग्लंडच्या संघात संधी देण्यात आली आहे. तर लेग-स्पिनर सारा ग्लेनचा ला मात्र बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मागील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झालेली हीथर नाईट देखील या टी-२० मालिकेत दिसणार नाही. सोफी एक्लेस्टोन सध्या आयसीसी महिला गोलंदाजी रंकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.
इंग्लंड महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक चार्लोट एडवर्ड्सकडून सोफी एक्लेस्टोनच्या संघात पुनरागमनाबद्दल आनंद व्यक्त करण्यातब आला आहे. त्या म्हणाल्या की, “सोफीचे संघात पुनरागमन ही आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती आमच्या संघाची सामना जिंकून देणारी महत्वाची खेळाडू आहे.”
Did someone say squad announcement? 👀
Our T20 squad has just dropped for our India series 👇
— England Cricket (@englandcricket) June 13, 2025
भारतीय महिला क्रिकेट संघाबाबत बोलायचे झाल्यास इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ आधीच जाहीर करण्यात आला आहे, ज्यामध्ये हरमनप्रीत कौर कर्णधारपदाकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी धुरा सांभाळताना दिसणार आहे.
हेही वाचा : IND Vs END : ‘टीम इंडियाची तयारी, पण आम्ही सज्ज..’, इंग्लंड कसोटी संघाच्या प्रशिक्षकांनी भरला हुंकार!
नेट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), एम आर्लॉट, टॅमी ब्यूमोंट, , अॅलिस कॅप्सी, लॉरेन बेल चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फाइलर, एमी जोन्स, डॅनी व्याट-हॉज, पेज स्कोफिल्ड, लिन्से स्मिथ, इस्सी वोंग.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टीका भाटिया (यष्टीरक्षक), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, राधा यादव, अमनजोती, अरविंद गोविंद, अरविंद गोविंद, दीप्ती शर्मा. सातघरे.