जोस हेझलवूड आणि मिशेल स्टार्क(फोटो-सोशल मीडिय)
WTC 2025 Final : जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना चांगलाच रंगदार होत आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २८१ धावांची आघाडी मिळवली होती. यामध्ये मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांचे योगदान मोठे राहिले आहे. या दोघांनी ऑस्ट्रेलियासाठी शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाल मोठी आघाडी मिळवून दिली आहे. जोश हेझलवूड आणि स्टार्क दोघांनीही शेवटच्या विकेटसाठी १३६ चेंडूंचा सामना करत शेवटच्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी रचली.
हेही वाचा : MCL 2025 : युनिव्हर्स बॉसचा विक्रम खालसा! टी-२० सामन्यात षटकारांचा आता ‘हा’ आहे नवीन ‘किंग’; पहा Video
तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २०७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने दिवसाच्या सुरुवातीलाच त्यांची ९ वी विकेट गमावली. त्यानंतर संघाचा स्कोअर १४८ धावांचा असताना मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूडने शानदार खेळी साकारली. १० व्या विकेटसाठी या दोघांमध्ये ५९ धावांची भागीदारी झाली. या खेळीसह या दोन्ही खेळाडूंनी ५० वर्षे जुना असलेला एक खास विक्रम देखील मोडीत काढला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्यात मिशेल स्टार्क आणि जोश हेडलवूड यांनी ५९ धावांची भागीदारी रचून एक नवीन विक्रम केला आहे. स्टार्क आणि जोश हेडलवूड या दोन्ही खेळाडूंनी आयसीसीच्या अंतिम सामन्यात १० व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी रचून विक्रम केला आहे. यापूर्वी १९७५ मध्ये डेनिस लिली आणि जेफ थॉमसन यांनी एकदिवसीय विश्वचषकात हा पराक्रम केला होता. या दोन्ही कॅरिबियन खेळाडूंनी शेवटच्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी रचली होती.
Mitchell Starc and Josh Hazlewood have put on the highest 10th-wicket partnership in any men’s ICC final 💪 pic.twitter.com/bmtwFSFgp1
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 13, 2025
कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाने २८२ धावांचा स्कोअर उभा केला आहे. लॉर्ड्सच्या मैदानाचा इतिहास बघता लक्षात येते की, २८० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना फक्त दोन वेळा विजय मिळवता आला आहे. इंग्लंडच्या संघाने शेवटचा हा पराक्रम २००४ मध्ये रचला होता. त्याच वेळी, १९८४ मध्ये, वेस्ट इंडिजने या मैदानावर ३४२ धावा करून इतिहास नोंदवला होता. हा दोन्ही संघांसाठी ऐतिहासिक विजय ठरला होता.
हेही वाचा : IND Vs END : ‘टीम इंडियाची तयारी, पण आम्ही सज्ज..’, इंग्लंड कसोटी संघाच्या प्रशिक्षकांनी भरला हुंकार!
टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.