IND vs ENG T-20 Match : पुणेकर, क्रिकेट चाहते तिकीटापासून वंचित; नागरिकांचा तीव्र संताप
पुणे : भारत विरुध्द इंग्लंडदरम्यानच्या मालिकेतील चौथा टी-२० क्रिकेट सामना आज, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. या महत्त्वाच्या लढतीसाठी सर्व सुविधांसह एमसीए सज्ज आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एका रंगतदार लढतीचा आनंद घेता येणार आहे. परंतु, अनेक क्रिकेट चाहत्यांना हा सामना लाईव्ह पाहण्यास न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त केला. कारण तिकीट बुकींग करण्यास गेल्यानंतर तिकीट अवघ्या 30 मिनिटात फुल्ल झाल्याने अनेक नागरिकांना तिकीट मिळाले नाहीत. त्यामुळे पुणेकर क्रिकेट चाहत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध
एमसीए स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध आहेत. येथे लढत बघण्याचा वेगळाच आनंद प्रेक्षकांना मिळत असतो. त्यामुळे खेळाडू आणि प्रेक्षकही या स्टेडियमवरील लढतीसाठी उत्सुक असतात. या स्टेडियममधील लढतींना प्रेक्षकांचा नेहमीच मोठा प्रतिसाद मिळत असतो. कारण, या स्टेडियममध्ये उपस्थित राहून लढत बघण्याचा आनंद अविस्मरणीय असतो.
संघांची तयारी
भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी संध्याकाळी स्टेडियममध्ये कसून सराव केला. या लढतीसाठी आपले समर्पण आणि वचनबद्धता त्यांनी दाखवून दिली. सध्या भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ असा आघाडीवर आहे. तेव्हा ही लढत जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याची भारताला संधी आहे. म्हणूनच पुण्यातील लढत महत्त्वपूर्ण आहे. या लढतीच्या सज्जतेसाठी गुरुवारी भारतीय खेळाडूंनी सरावाद्वारे आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले. दुसरीकडे, इंग्लंड संघाने गुरुवारी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सराव सत्रात भाग घेतला नाही. इंग्लंडही मालिकेत २-२ अशी बरोबरी साधण्यासाठी उत्सुक आहे.
स्टेडियमची सज्जता
प्रेक्षकांना भारत-इंग्लंड या आंतरराष्ट्रीय टी-२०चा आनंद घेता यावा, यासाठी एमसीएने कोणतीही कसर सोडली नाही. ४५ एकरच्या विस्तीर्ण जागेत स्टेडियम परीसरात पार्किंगची प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या गाड्या पार्क करण्याबाबत प्रेक्षकांची कुठलीही गैरसोय होणार नाही. स्टेडियममध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला पीण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. या लढतीसाठी एमसीए पूर्णपणे सज्ज असून, प्रेक्षकांना कुठलीही तक्रारीची संधी दिली जाणार नाही. प्रेक्षकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, यासाठी एमसीए दक्ष आहे.
सर्व तिकिटांची विक्री
सामन्याची सर्व तिकिटे ऑनलाइन विकली गेली. या लढतीसाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांनी नेहमी प्रमाणे पुण्यातील लढतीला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या लढतीची सर्व ३३ हजार०५७ तिकिटे विकली गेली आहे. त्यामुळे स्टेडियम हाऊसफुल होणार आहे. यातून या स्टेडियममध्ये लढत बघण्याचे महत्त्व अधोरेखित होते. एक हाऊसफुल लढत पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे.
प्रेक्षकांसाठी स्टेडियम खासच
एमसीए स्टेडियम नेहमीच क्रिकेट उत्साहींसाठी एक खास ठिकाण राहिले आहे. चाहत्यांचा उत्साह द्विगुणित करण्याचा आणि लढत बघण्याचा आनंद संस्मरणीय करण्यासाठी एमसीए नेहमीच प्रयत्नशील असते. उद्याचा सामना आणखी एक ब्लॉकबस्टर ठरण्याची आशा आहे. कारण, दोन्ही संघ आव्हानात्मक असून, एक रंगतदार लढत चाहत्यांना बघायला मिळणार आहे.
चाहत्यांसाठी वचनबद्धता
एमसीए सर्व उपस्थितांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे. उच्च दर्जाच्या सुविधांपासून ते सुरक्षित आणि स्वागतार्ह वातावरणापर्यंत, चाहत्यांना खेळाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता यावा यासाठी एमसीएकडून सर्वतोपरी प्रयत्न केले गेले आहेत. ‘आम्ही उद्या एमसीए स्टेडियममध्ये क्रिकेटप्रेमींचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत. ही लढत नक्कीच प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय अनुभव देणारी ठरणार आहे. आपल्या भारतीय संघाला, आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांचा जयजयकार करण्यासाठी आणि क्रिकेटच्या भावनेचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येऊया,’ असे आवाहन एमसीएने केले आहे.