IND vs ENG: 'The decision is not made by the player but..', Ravi Shastri's anger over Jasprit Bumrah's duck; Stuart Broad was also surprised
Ravi Shastri’s anger after Jasprit Bumrah was dropped : भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. आज या मालिकेतील दूसरा सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळवला जात आहे. सामन्यापूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यात चर्चा रंगली आहे ती म्हणजे भारतीय संघात ३ बदल करण्यात आले आहे. यामध्ये भारताचा महत्वाचा गोलंदाज जसप्रीत बूमराहला वगळण्यात आले आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की “एजबॅस्टन कसोटीसारख्या महत्त्वाच्या सामन्यात बुमराहला वगळणे समजण्यासारखे नाही”
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. यामध्ये भारताचे क्षेत्ररक्षण आणि कमकुवत गोलंदाजी ही दोन परभवाचे मुख्य कारण सांगता येतील. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराहने पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावात मात्र त्याला विकेट घेण्यात यश आले नाही. यानंतर त्याच्या कार्यभाराचे संतुलन राखण्यासाठी त्याला एजबॅस्टन कसोटीतून वगळण्यात आले आहे. मात्र यावर माजी प्रशिक्षक नाराज झाले आहे.
काय म्हणाले रावी शास्त्री?
भारत सध्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत बुमराहसारख्या महत्वाच्या वेगवान गोलंदाजाला विश्रांती देणे त्यांना शास्त्री यांना अजिबात आवडले नाही. शास्त्री म्हणाले, “हा सामना खूप महत्त्वाचा असून बुमराहला आधीच एक आठवड्याची विश्रांती मिळाली होती. अशा सामन्यांमध्ये निर्णय खेळाडूने नव्हे तर कर्णधार आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांनी घ्यायला हवेत. हा सामना भारतासाठी जास्त महत्त्वाचा आहे. येथे जिंकून मालिका बरोबरीत आणता येते. मग तुम्हाला पाहिजे असल्यास लॉर्ड्स कसोटीत बुमराहला विश्रांती द्या, पण आता नाही.” असे शास्त्री म्हणाले.
बुमराहच्या जागी भारताने आकाश दीपला संघात स्थान दिले आहे. भारताची फलंदाजी मजबूत करण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश रेड्डी यांना देखील संघात संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा : IND vs ENG T-20 Match : रिचा घोषने रचला इतिहास! केला ‘हा’ भीम पराक्रम; असे करणारी ठरली जगातील पहिली फलंदाज
इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने देखील बुमराहला बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. तो म्हणाला, “वेगवान गोलंदाजासाठी एका आठवड्याचा ब्रेक पुरेसा असतो. मालिका सुरू होण्यापूर्वी बुमराह फक्त तीन कसोटी खेळेल असे सांगण्यात आले होते याचे मला आश्चर्य वाटतया आहे. अशा योजना गुप्त ठेवायला हव्यात, जेणेकरून खेळाडू प्रत्येक सामन्यासाठी तयार राहतात.”