रिचा घोष(फोटो-सोशल मिडिया)
Richa Ghosh created history : भारत आणि इंग्लंड या दोन महिला संघांमध्ये टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दिसऱ्या टी २० सामन्यात भारतीय महिला विकेटकीपर फलंदाज रिचा घोषने इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात नाबाद ३२ धावा करून रिचा घोषने मोठी कामगिरी करून दाखवली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने पहिले १००० धावा करणारी ती भारतीय महिला संघाची पहिली खेळाडू ठरली आहे. इतकेच नाही तर रिचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडूंच्या बाबतीत १००० धावा पूर्ण करणारी दुसरी सर्वात जलद फलंदाज बनली आहे. तर पूर्ण सदस्य देशांच्या खेळाडूंमधून ही कामगिरी करून दाखवणारी ती पहिली खेळाडू देखील ठरली आहे.
रिचा घोषने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. भारतीय संघासाठी रिचाने सहाव्या स्थानावर फलंदाजी करताना तिने फक्त २० चेंडूंचा सामना करून १६०.०० च्या स्ट्राईक रेटने ३२ धावा फटकावल्या. यादरम्यान घोषने तिच्या ६ चौकार लगावले. या खेळीमुळे भारताला १८१ धावांचा आकडा गाठता आला.
रिचा घोष भारतात ‘लेडी धोनी’ म्हणून ओळखले जाते. कारण तिची फलंदाजीची शैली पुरुष संघाच्या माजी कर्णधार एमएस धोनीच्या शैलीसोबत मिळतीजुळती दिसून येते. ती धोनीसारखी विकेटकीपर फलंदाज देखील आहे आणि संघात खालच्या क्रमात फिनिशर म्हणून देखील ती भूमिका बजावत असते. महिला प्रीमियर लीगमधील केलेल्या प्रभावी कामगिरीने आणि फिनिशिंग क्षमतेने तिच्या नावासोबत लेडी धोनी हेटोपणनाव जोडले जावून अधिक मजबूत झाले आहे.
रिचा घोषच्या टी२० कारकीर्दीबाबत सांगायचे झाल्यास, तिने भारतीय महिला संघासाठी ६४ टी२० सामने खेळले आहेत. यादरम्यान, तिच्या बॅटमधून ५३ डावांमध्ये २७.८१ च्या सरासरीने १०२९ धावा आल्या आहेत. रिचाने टी२० क्रिकेटमध्ये दोन अर्धशतके लगावाली आहेत. येथे तिने आतापर्यंत रिचा घोषने १४३.१२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे.