वियान मुल्डर(फोटो-सोशल मीडिया)
Wian Mulder named South Africa’s new captain : दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत पहिल्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला नवा कर्णधार मिळाला होता. संघाची धुरा केशव महाराजकडे देण्यात आली होती. त्याच वेळी, आता या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आणखी एक नवा कर्णधार बघायला मिळणार आहे. केशव महाराज दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. महाराजला पाठीच्या दुखण्यामुळे तो झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही.
केशव महाराज बाहेर पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून नव्या कर्णधाराची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची वियान मुल्डरदके सोपवण्यात आली आहे. वियान मुल्डर झिम्बाब्वेविरुद्ध कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. बुलावायो येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ३३८ धावांनी मोठा विजय मिळवला होता. या संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकणारे फक्त चार खेळाडूंचा समावेश होता.
हेही वाचा : IND vs ENG T-20 Match : रिचा घोषने रचला इतिहास! केला ‘हा’ भीम पराक्रम; असे करणारी ठरली जगातील पहिली फलंदाज
दुखापतीमुळे केशव महाराज मालिकेबाहेर
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने या बातमीला दुजोरा दिला आहे की, संघाचा अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज दुखापतीमुळे चालू कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या दुखापतीची तीव्रता तपासण्यासाठी त्याला मायदेशी परत पाठवण्यात येणार आहे. महाराजची जागा फिरकी गोलंदाज सेनुरन मुथुसामीने घेतली आहे, ज्याने आतापर्यंत चार कसोटी सामने खेळलेले आहेत. या दौऱ्यात अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत महाराजकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते.
दक्षिण आफ्रिका क्रिकेटने सांगितले की, “झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वियान मुल्डर संघाचे नेतृत्व करणार आहे. हा सामना ६ जुलैपासून बुलावायो येथे खेळवण्यात येणार आहे. पहिल्या कसोटीत मुल्डरने शानदार कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या डावात चार विकेट्स घेतल्या आणि नंतर फलंदाजीतून १४७ धावांची शानदार खेळी देखील साकारली आहे.
वेगवान गोलंदाजी आक्रमणात संतुलन राखण्याच्या हेतूने दुसऱ्या कसोटीसाठी लुंगी न्गिडीला संघातून डच्चू देण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या कसोटीत कोडी युसुफ, क्वेना म्फाका, कॉर्बिन बॉश आणि मुल्डर सारख्या तरुण वेगवान गोलंदाजांसह खेळला होता. तर महाराज हा संघात एकमेव फिरकी गोलंदाज होता. सीएसएकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, संघ तरुण खेळाडूंना संधी देऊन भविष्यासाठी एक मजबूत संघ तयार करण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत.