फोटो सौजन्य – X
Vaibhav Suryavanshi Next Match : भारताचा U19 संघ सध्या इंग्लड दौऱ्यावर आहे, इंग्लडविरुद्ध एकदिवसीय मालिका झाल्यानंतर आता दोन सामन्याची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना झाला आहे. या पहिल्या सामन्यामध्ये कोणताही संघाला विजय मिळाला नाही सामना अनिर्णयित राहिला. भारताचा स्टार युवा खेळाडू वैभव सुर्यवंशी याने पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजीमध्ये फार काही चांगली कामगिरी केली नाही पण गोलंदाजीमध्ये त्याने कहर केला होता.
भारताचा स्टार आता पुढील सामना कधी आणि कुठे खेळणार यासंदर्भात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये मालिकेचा दुसरा सामना हा 20 जुलै ते 23 जुलै यादरम्यान खेळवला जाणार आहे. या मालिकेचा दुसरा कसोटी सामना असणार आहे. या सामन्याचे आयोजन काउंटी ग्राउंड, चेम्सफोर्ड येथे करण्यात आले आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरु होईल. आयपीएल 2025 मधून प्रसिद्धीझोतात आलेला युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी देखील इंग्लंडमध्ये दिसतो.
Fan favourite already! 🙇♂️
Vaibhav Suryavanshi spotted signing autographs in London — his fandom goes beyond India now! 🔥#VaibhavSuryavanshi #ENGvIND pic.twitter.com/TFdpByYsIl
— OneCricket (@OneCricketApp) July 16, 2025
वैभव भारतीय अंडर-19 संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आला आहे. भारतीय अंडर-19 संघ सध्या इंग्लंड अंडर-19 संघाविरुद्ध युवा कसोटीत खेळत आहे. वैभवने युवा कसोटीपूर्वी एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली होती आणि शतक ठोकले होते. वैभव हे भारतात एक प्रसिद्ध नाव आहे, पण इंग्लंडमध्येही त्याच्याबद्दलची क्रेझ दिसून येत आहे. वैभवचा ऑटोग्राफ घेण्यासाठी लोक उत्सुक असल्याचे दिसून आले. त्याच वेळी, वैभव चाहत्यांना निराश करत नाही आणि सेल्फीसाठी विनंत्या स्वीकारत आहे.
अपमानास्पद! लॉर्ड्स मैदानावर जाण्यापासून जितेश शर्माला रोखलं, DK पुढे केला मदतीचा हात
वैभवची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासन्तास गाडी चालवत आहेत. वैभवने आयपीएलमध्ये शतक झळकावले होते आणि तो टी-20 मध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला. १४ वर्षांचा वैभव हा आयपीएल लिलावात विकला जाणारा सर्वात तरुण खेळाडू आहे आणि बिहारच्या या फलंदाजाने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. इंग्लंडमधील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा वैभववर आहेत.
बेकेनहॅम येथे झालेल्या पहिल्या युवा कसोटी सामन्यादरम्यान ब्रिटनमध्ये राहणाऱ्या मोठ्या भारतीय प्रवासी समुदायाचे आणि स्थानिकांचे डोळे या डावखुऱ्या फलंदाजावर होते. “तो माझा आदर्श आहे. मला त्याची आक्रमक फलंदाजीची शैली आवडते,” असे बेकेनहॅममधील एका स्थानिक मुलाने रेड बॉल मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी केंट काउंटी क्रिकेट मैदानावर सूर्यवंशीकडून ऑटोग्राफ घेतल्यानंतर सांगितले.