IND vs ENG: Who will be the winner of the Leeds Test pitch? Batsmen or bowlers? Mystery revealed; Read in detail..
IND vs ENG : २० जूनपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत, भारताचा नवा कर्णधार शुभमन गिलसाठी ही मालिका एखाद्या दिव्यापेक्षा कमी असणार नाही. कसोटी सामन्यांदरम्यान इंग्लंडच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे हे नेहमीच कठीण राहिले आहे. अशा परिस्थितीत, इंग्लंडचे गोलंदाज टीम इंडियाच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतात.
मालिकेचा पहिला सामना २० जूनयापासूनहेडिंग्ले, लीड्स येथे खेळला जाणार आहे. आता या मैदानाचा नवीनतम खेळपट्टी अहवाल समोर आला असून पहिल्या सामन्याच्या खेळपट्टीवर कोण वर्चस्व गाजवणार? फलंदाज की गोलंदाज? याबाबत आपण जाणून घेऊ.
रेव्ह स्पोर्ट्सच्या मते, पहिल्या कसोटी सामन्याची खेळपट्टी पूर्णपणे हिरवीगार असणार आहे. अशा परिस्थितीत, सामन्याच्या सुरुवातीच्या काळात गोलंदाज फलंदाजांवर नियंत्रण ठेवतील असे दिसून येत आहे. या मैदानावर धावा काढण्यासाठी फलंदाजांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. येथे, जो संघ नाणेफेकिचा कौल जिंकेल तो प्रथम गोलंदाजी करण्यास पसंती देईल. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला खेळपट्टीतील ओलाव्याचा फायदा मिळणार आहे.
PITCH FOR THE FIRST TEST BETWEEN INDIA vs ENGLAND. [📸: RevSportz] pic.twitter.com/ecOZgiHq0A
— Johns. (@CricCrazyJohns) June 18, 2025
आजवर हे नेहमीच दिसून आले आहे की, हवामानाची परिस्थिती इंग्लंडच्या खेळपट्टीवर मोठ्या परिणाम करत आल्याचे दिसत आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, २० जून रोजी लीड्समध्ये तापमान ३० अंशांपेक्षा जास्त असणार आहे. ही बातमी फलंदाजांना नक्कीच आनंद देणारी असू शकते, कारण अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी धावा काढण्यास सोपे जाणार आहे.
केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल इंग्लंडविरुद्ध सलामीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर आणि कर्णधार शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर खेळण्यास येऊ शकतात. त्यानंतर करुण नायर, ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूर मधल्या फळीत खेळताना दिसू शकतात.
हेही वाचा : १३ गगनचुंबी षटकारांचा पाऊस, IPL मध्ये सुपर फ्लॉप मॅक्सवेलचा मेजर लीग स्पर्धेत धूमधडाका! झळकावले स्फोटक शतक..
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, शार्दुल ठाकूर, कृष्णा सिंह, अर्शदीप सिंह, अर्शदीप सिंह, कृष्णा, कृष्णा, कृष्णा, सी. कुलदीप यादव आणि हर्षित राणा.