टीम इंडिया(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : २० जूनपासून भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात करणार आहे. सामन्याने इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेला सुरवात होणार आहे. त्यासाठी टीम इंडिया १७ जून रोजी लीड्समध्ये पोहोचली आहे. आता लीड्समध्ये पोहोचल्यानंतर टीम इंडियाने सराव सोडून विश्रांती घेतली आणि विश्रांतीच्या नावे भारतीय संघातील खेळाडूंनी लीड्समध्ये फिरणे पसंत केले. खेळाडूच नाही तर टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर देखील फिरायला बाहेर पडले आहेत.
हेही वाचा : चौकार-षटकरांची आतिषबाजी! SRH च्या स्टार फलंदाजाचा MPL 2025 मध्ये राडा! शतकाची हुलकावणी पण खेळीने पैसे वसूल..
नेमकां काय घडलं?
मीडिया रिपोर्टनुसार, काही खेळाडू कॉफी पिण्यासाठी बाहेर गेले, तर काही शहरात फिरायला गेले आणि बरेच सदस्य गोल्फ खेळण्यासाठी देखील गेल्याचे समजते. अहवालात असे देखील सांगण्यात आले आहे की, टीम इंडिया लीड्समध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबली आहे त्या हॉटेलभोवती भारतीय खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल उपलब्ध आहेत. एकंदरीत, टीम इंडिया पूर्णपणे आरामशीर मूडमध्ये असल्याचे दिसत असल्याचे समोर आले आहे.
केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, नितीश कुमार रेड्डी आणि प्रसिद्ध कृष्णा हे खेळाडू कॉफी पिण्यासाठी बाहेर गेले होते. पहिल्यांदाच इंग्लंड दौऱ्यावर आलेले नवीन खेळाडूंनी शहराला भेट देण्याचा निर्णय घेतला होता. तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोल्फ खेळण्यासाठी गेलेल्यांमध्ये करुण नायरसारखा खेळाडू देखील होता. त्याच्याशिवाय, संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर देखील गोल्फ कोर्सला गेल्याची माहिती माहिती समोर येत आहे.
हेही वाचा : १३ गगनचुंबी षटकारांचा पाऊस, IPL मध्ये सुपर फ्लॉप मॅक्सवेलचा मेजर लीग स्पर्धेत धूमधडाका! झळकावले स्फोटक शतक..
लीड्समध्ये पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज यांनी त्यांच्या नवीन हेअरस्टाईलने लक्ष वेधून घेतले आहे. या विश्रांती कालावधीनंतर, टीम इंडिया २० जूनपूर्वी दोन पूर्ण सराव सत्रे घेणार आहेत. ज्यामध्ये सर्व तयारी तपासल्या जाणार आणि शेवटची चाचणी देखील घेण्यात येणार आहे.