फोटो सौजन्य – X
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेत भारताचा संघ हा पिछाडीवर आहे. भारताच्या संघाला लाॅर्ड्स कसोटीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताचा पुढील सामना हा मँचेस्टर येथे खेळवला जाणार आहे, भारताच्या संघासाठी हा सामना फारच महत्वाचा असणार आहे. टीम इंडीया या सामन्यामध्ये कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भारतीय संघाचा लाॅर्ड्स कसोटीमध्ये भारताचा विकेटकिपर ऋषभ पंत हा जखमी झाल्यामुळे त्याला सामन्याबाहेर व्हावे लागले होते.
लॉर्ड्स कसोटीतील पराभवानंतर, टीम इंडिया आता मँचेस्टरमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याची तयारी करत आहे. सध्या शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे. आतापर्यंत ऋषभ पंतने या मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तो ज्या प्रकारे निर्भयपणे धावा काढत आहे, त्यामुळे विरोधी संघही त्याला घाबरत आहे.
कसोटी क्रिकेट बदलणार! टू टीयर सिस्टम आणण्याची तयारी सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती
तिसऱ्या सामन्यात विकेटकीपिंग करताना विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला बोटाला दुखापत झाली. पहिल्या डावात त्याला ही दुखापत झाली, ज्यामुळे पंतला मैदान सोडावे लागले. आता टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेटे यांनी चौथ्या कसोटीत खेळण्याबाबत एक मोठे विधान केले आहे. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने शानदार फलंदाजी केली आणि ७४ धावा केल्या, ज्यामध्ये २ षटकारांचा समावेश होता.
या सामन्यात विकेटकीपिंग करताना त्याला बोटाला दुखापत झाली, त्यानंतर ध्रुव जुरेल संपूर्ण सामन्यात विकेटकीपिंग करताना दिसला. दुखापतीनंतर पंतने फलंदाजी केली असली तरी दुसऱ्या डावात तो काही खास करू शकला नाही. चौथ्या कसोटीत त्याच्या खेळण्याबद्दल आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, ज्यावर सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनी उत्तर दिले, “पंतने लॉर्ड्सवर खूप वेदना सहन करत फलंदाजी केली, संघ पुन्हा या परिस्थितीतून जाऊ इच्छित नाही. सामन्याच्या मध्यभागी आम्हाला यष्टीरक्षक बदलण्याची गरज नाही.
#WATCH | Beckenham, UK: On Rishabh Pant, Team India’s Assistant Coach, Ryan ten Doeschate says, “He will bat in Manchester…He batted with quite a lot of pain in the third Test, and it’s only going to get easier and easier on his finger. Keeping is obviously the last part of the… pic.twitter.com/E5eRmwmnsu
— ANI (@ANI) July 17, 2025
पंतने आजच्या सराव सत्रात भाग घेतला नाही कारण आम्हाला त्याला जास्तीत जास्त विश्रांती द्यायची आहे. आम्हाला आशा आहे की तो मँचेस्टरमध्ये खेळण्यासाठी तयार असेल.” जर ऋषभ पंत मँचेस्टर कसोटीत खेळला तर तो महान फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या एका खास विक्रमावर लक्ष केंद्रित करेल. सेहवाग हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज आहे.