Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : यशस्वी जयस्वाल एक्सप्रेस सुसाट! इंग्लंडविरुद्ध तब्बल ५१ वर्षांचा विक्रम केला खालसा 

भारत आणि इंग्लंड यांच्यात दूसरा कसोटी सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने शानदार ८७ धावांची खेळी करून ५१ वर्ष जुना विक्रम मोडला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 03, 2025 | 08:00 PM
IND Vs ENG: Yashasvi Jaiswal Express Susat! Khalsa breaks 51-year-old record against England

IND Vs ENG: Yashasvi Jaiswal Express Susat! Khalsa breaks 51-year-old record against England

Follow Us
Close
Follow Us:

Yashasvi Jaiswal breaks 51-year-old record : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दूसरा कसोटी सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळला जात आहे. या सामन्याचा पहिल्या दिवसाअखेर भारताने  ५ गडी गमावत ३१० धावा केल्या आहेत. तर कर्णधार शुभमन गिल ११४ धावा आणि रवींद्र जाडेजा ४१ धावांवर नाबाद आहेत. या सामन्यात भारताकडून यशस्वी जयस्वालने देखील शानदार अर्धशतक झळकावले आहे. त्याने ८७ धावांची खेळी केली आहे.  पहिल्या डावात तो शतक झळकावण्यास हुकला असला तरी, त्याच्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. या खेळीसह त्याने एक विक्रम देखील मोडीत काढला आहे.

यशस्वी दुसऱ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध निर्भयपणे फलंदाजी करताना दिसून आला. या डावात त्याने १०३ चेंडूंचा सामना करत ८७ धावा केल्या. परंतु, त्याला इंग्लिश कर्णधाराने माघारी पाठवले. एजबॅस्टन येथे शतक झळकावण्यापासून जयस्वाल फक्त  १३ धावा दूर राहिला. असे असून देखील त्याने बर्मिंगहॅमच्या या मैदानावर ५१ वर्षांचा विक्रम मोडलाया आहे.

हेही वाचा : IND vs ENG : मागील 4 वर्षात कॅप्टन गिलने या देशाच्या विरुद्ध केल्या सर्वाधिक धावा! आकडे पाहून बसेल धक्का

यशस्वीकडून ५१ वर्षांचा विक्रम खालसा

टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ८७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १३ चौकार लगावले. यासह, जयस्वालने बर्मिंगहॅमच्या मैदानावर ५१ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. आता तो या मैदानावर सर्वात मोठी खेळी खेळणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. या दरम्यान त्याने सुधीर नाईकचा विक्रम मोडला असून त्यांनी १९७४ मध्ये येथे ७७ धावा केल्या होत्या.

बर्मिंगहॅममध्ये सर्वाधिक खेळी खेळणारे भारतीय सलामीवीर फलंदाज

  1. यशस्वी जयस्वाल – ८७ धावा
  2. सुधीर नाईक – ७७ धावा
  3. सुनील गावस्कर – ६८ धावा
  4. चेतेश्वर पुजारा – ६६ धावा
  5. चेतन चौहान – ५६ धावा

यशस्वी जयस्वालसाठी इंग्लंडचा हा दौरा आतापर्यंतचा सर्वोत्तम  जात आहे. त्याने लीड्स कसोटी सामन्यात पहिल्या डावात १०१ धावा ठोकल्या होत्या. आता त्याने एजबॅस्टनच्या पहिल्या डावात देखील आपला फॉर्म कायम ठेवत ८७ धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वालने आतापर्यंत एकूण २१ कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्याने १९९० धावा फटकावल्या आहेत. आता तो कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यापासून फक्त १० धावा दूर आहे.

हेही वाचा : 6,6,6,2,2,6… टेक्सास सुपर किंग्सच्या नव्या सुपरस्टारने मैदानावर केला कहर! संघाला मिळवुन दिला सहावा विजय

सामन्याची स्थिती

पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत कर्णधार शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा क्रीजवर उपस्थित होते. गिल ११४ धावांवर आणि रवींद्र जडेजा ४१ धावांवर नाबाद आहेत.

Web Title: Ind vs eng yashasvi jaiswal breaks 51 year old record against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 
1

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 

Duleep Trophy 2025 स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंचा लागणार कस! दमदार कामगिरीवर असणार भर  
2

Duleep Trophy 2025 स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंचा लागणार कस! दमदार कामगिरीवर असणार भर  

‘इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळाल्याने अर्शदीप सिंग अस्वस्थ..’, Asia Cup 2025 पूर्वी प्रशिक्षकांच्या खुलाशाने उडाली खळबळ
3

‘इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळाल्याने अर्शदीप सिंग अस्वस्थ..’, Asia Cup 2025 पूर्वी प्रशिक्षकांच्या खुलाशाने उडाली खळबळ

‘चेहऱ्यावर हसू का दिसत नाही..’ दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ; अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान नेमकं काय घडलं?
4

‘चेहऱ्यावर हसू का दिसत नाही..’ दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ; अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.