भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. रोहित शर्माच्या निवृतीनंतर भारताचे कसोटी कर्णधारपद हे शुभमन गिलच्या हाती देण्यात आले आहे. तो सध्या त्याच्या नेतृत्वामध्ये दुसरा सामना खेळत आहे, त्याने त्याच्या दुसऱ्या सामन्यात दुसरे शतक झळकावले आहे. त्याने टीम इंडीयासाठी आतापर्यत सर्वाधिक धावा कोणत्या देशाविरुद्ध केल्या आहेत यासंदर्भात वाचा.
भारतासाठी शुभमन गिलने मागिल ४ वर्षात केलेली कामगिरी. फोटो सौजन्य - X (BCCI)
शुभमन गिल याने सुरु असलेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये शतक झळकावले होते. त्याने इंग्लडविरुद्ध 147 धावा केल्या होत्या पण या सामन्यात भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. फोटो सौजन्य - X (BCCI)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुभमन गिल याने त्याच्या कसोटी करिअरमध्ये 128 धावांची खेळी खेळली होती. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये 2023 मध्ये त्याने पहिल्या डावामध्ये शतक झळकावले होते. फोटो सौजन्य - X (BCCI)
2024 मध्ये झालेल्या भारत विरुद्ध बांग्लादेश मालिकेमध्ये शुभमन गिल याने 119 धावांची नाबाद खेळी खेळली होती. हे शतक त्याने चेन्नईमध्ये दुसऱ्या डावामध्ये झळकावले होते. फोटो सौजन्य - X (BCCI)
2024 मध्ये भारत विरुद्द इंग्लड यांच्यामध्ये मालिका झाली होती. यामध्ये त्याने पहिल्या डावामध्ये शतक झळकावले होते. त्याने 110 धावांची खेळी धर्मशाळा येथे खेळली होती. फोटो सौजन्य - X (BCCI)
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये झालेल्या 2022 मध्ये मालिकेत शुभमन गिल याने दुसऱ्या डावामध्ये शतक झळकावले होते. त्याने या सामन्यात 110 धावांची खेळी खेळली होती. फोटो सौजन्य - X (BCCI)