Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hockey World Cup 2026: भारत-नेदरलँड्समध्ये ‘हायव्होल्टेज’ महामुकाबला! सामना कधी, कुठे अन् किती वाजता? जाणून घ्या

IND vs NED Hockey World Cup 2026: हॉकी विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत भारताचा सामना नेदरलँड्सशी होणार आहे. हा सामना तुम्ही कधी, कुठे आणि कसा पाहू शकता, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 22, 2026 | 07:01 PM
IND vs NED Hockey World Cup 2026

IND vs NED Hockey World Cup 2026

Follow Us
Follow Us:
  • भारत-नेदरलँड्समध्ये ‘हॉकी वॉर’!
  • सेमीफायनलच्या शर्यतीसाठी महामुकाबला
  • जाणून घ्या वेळ अन् लाईव्ह स्ट्रीमिंग
पुरुष हॉकी विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने ‘पूल डी’ मधील तीन सामन्यांपैकी एक सामना गमावून आणि दोन जिंकून अव्वल आठ संघांमध्ये आपले स्थान निश्चित केले. भारतीय हॉकी संघाने आता ‘पूल ई’ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे, ज्यामध्ये इंग्लंड, यजमान नेदरलँड्स आणि अर्जेंटिना यांचा समावेश आहे. भारतीय संघ २२ ऑगस्ट रोजी आमस्टेलवीन येथील वेगेनर स्टेडियमवर यजमान नेदरलँड्सविरुद्ध आपला सलामीचा सामना खेळेल.

IND vs SL: कुलदीपचा ‘गेम ओव्हर’ अन् सारांश जैनचा डेब्यू? टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठा बदल

भारताने फक्त एकच सामना गमावला

भारताने वेल्सला ३-१ ने पराभूत करून हॉकी विश्वचषकाची शानदार सुरुवात केली. त्यानंतर संघाला इंग्लंडकडून मोठा पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून भारताने दोन विजय आणि एका पराभवासह दुसऱ्या फेरीत आपले स्थान निश्चित केले. नेदरलँड्सने आतापर्यंत वर्चस्व गाजवले असून, त्यांनी न्यूझीलंडला ५-१, अर्जेंटिनाला ३-१ आणि जपानला ४-१ ने पराभूत केले आहे.

सामना कुठे आणि किती वाजता सुरू होईल?

भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील हॉकी विश्वचषक सामना आज, २२ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. हे दोन्ही संघ नेदरलँड्समधील अॅमस्टेलवीन येथील वॅग्नर हॉकी स्टेडियमवर आमनेसामने येतील. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल. हा सामना भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओ हॉटस्टार ॲपवर थेट प्रसारित केला जाईल. नेदरलँड्सने पहिल्या फेरीत तिन्ही सामने जिंकून दमदार कामगिरी केली होती. भारतीय प्रेक्षक हा सामना डीडी स्पोर्ट्सवर विनामूल्य पाहू शकतात. यासाठी तुमच्या घरी डीडी फ्री डिश कनेक्शन असणे आवश्यक आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल.

हेड टू हेड रेकॉर्ड

भारतीय पुरुष हॉकी संघाची नेदरलँड्सविरुद्धची हेड टू हेड रेकॉर्ड फारशी प्रभावी नाही. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये २४ सामने खेळले गेले असून, त्यापैकी नेदरलँड्सने ११, तर भारतीय संघाने ६ सामने जिंकले आहेत. तर ७ सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे, हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. २०२६ च्या हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थानाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी, भारतीय संघाला या टप्प्यावरील आपले दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे, ज्यामुळे नेदरलँड्सविरुद्धचा हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.

Cricket News: इंग्लंडच्या ‘या’ स्टार खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय; १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम

Web Title: Ind vs ned hockey world cup 2026 match time live streaming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • Hockey Team India
  • Hockey World Cup 2026
  • IND vs NED
  • Indian Men's Hockey Team

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : हर कर मैदान फतेह ; ‘या’ पाच कारणांमुळे भारतासाठी खास राहिली ही स्पर्धा
1

Asian Games 2026 : हर कर मैदान फतेह ; ‘या’ पाच कारणांमुळे भारतासाठी खास राहिली ही स्पर्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.