४१ वर्षीय व्हॅन डेर मेर्वेनेचा जादुई झेल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs NED, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज ३६ वा सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात असून या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ६ गडी गमावून १९३ धावा केल्या आहेत. या दरम्यान, नेदरलँड्सचा अनुभवी अष्टपैलू रोएलॉफ व्हॅन डेर मेर्वे पुन्हा एकदा त्याच्या चपळाई आणि फिटनेससाठी चांगलाच चर्चेत आहे. ४१ वर्षीय मेर्वेने जगभरातील अनेक टी२० लीगमध्ये देखील भाग घेतला आहे आणि त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी तो प्रसिद्ध आहे. व्हॅन डेर मेर्वेने भारताविरुद्ध हवेत सुर मारून झेल घेतला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्यात मेर्वेने त्याच्या क्षेत्ररक्षणाने सर्वांना आश्चर्यचकीत केले. भारतीय फलंदाज तिलक वर्मा यांनी डावाच्या नवव्या षटकाचा शेवटचा चेंडू लॉन्ग ऑफच्या दिशेने खेळला. तो चेंडू सीमारेषेकडे जात असताना तिथेच उभा असलेला मेरवे लगेच उजवीकडे धाव घेत हवेत उडी मारत दोन्ही हातांनी एक शानदार झेल टिपला. या शानदार प्रयत्नाने तिलक वर्माची पारी समाप्त झाली. व्हॅन डेर मेर्वेच्या झेलची मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी चांगलीच वाह वाह केली.
Undoubtedly, the Greatest ever catch by 41-year-old Roelof van der Merwe in T20 World Cup. pic.twitter.com/3YqgqGROY4 — World Monitor (@MonitorWarnow) February 18, 2026
तिलक वर्माला भारतीय संघाचा महत्त्वाचा फलंदाज मानले जात असून त्याने या(टी-२० विश्वचषक २०२६ )स्पर्धेत चांगली सुरुवात केली, परंतु त्याला त्या सुरुवातीला मोठ्या धावसंख्येत रूपांतर करतया आले नाही. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्याने २७ चेंडूत ३१ धावा फटकावल्या. याआधी त्याने पाकिस्तानविरुद्ध २४ चेंडूत २५ धावा केल्या होत्या. त्याने नामिबियाविरुद्ध २१ चेंडूत २५ धावा केल्या आणि अमेरिकेविरुद्ध १६ चेंडूत २५ धावा केल्या होत्या.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील ३६ व्या सामन्यात, भारताने नेदरलँड्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून १९३ धावा उभ्या केल्या. भारतीय संघाकडून शिवम दुबेने शानदार फलंदाजी करत सर्वाधिक ६६ धावांची खेळी. त्याच्या जलद खेळीने संघाला मजबूत धावसंख्या गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नेदरलँड्सकडून बीक्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.






