शिवम दुबे(फोटो-सोशल मीडिया)
Shivam Dubey creates a record in the T20 World Cup : टी-२० विश्वचषक २०२६ चा ३६ वा सामना १८ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे भारत आणि नेदरलँड्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव केला. हा स्पर्धेत भारताचा सलग चौथा विजय होता. नेदरलँड्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ५ गडी गमावून १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल नेदरलँड्स २० षटकांत केवळ १७६ धावाच करू शकला परिणामी संघाला पराभव पत्करावा लागला.
भारताच्या या विजयात अष्टपैलू शिवम दुबेने महत्त्वाची भूमिका वठवली. त्याने फलंदाजी करत ६६ धावांची विजयी खेळी खेळली तर गोलंदाजीमध्ये महत्वाच्या २ विकेट्स काढल्या. नेदरलँड्सविरुद्धच्या त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीने त्याने भारतीय दिग्गज युवराज सिंग आणि रोहित शर्मा यांचे विक्रयम मोडीत काढले. त्याने संघातील सहकारी हार्दिक पंड्याला देखील मागे टाकले. शिवम दुबेच्या अनोख्या विक्रमाबद्दल आपण माहिती घेऊया.
एकेकाळी टीम इंडियाने ९ षटकांत ६९ धावा केल्यानंतर महत्वाच्या ३ विकेट गमावल्या होत्या त्यामुळे संघ चांगलाच आढकणीत आला होता. आशा वेळी शिवम दुबे फलंदाजीसाठी आला आणि त्याने डाव सावरला. त्याने आक्रमक धावा काढण्यास सुरुवात केली. दुबेने फक्त ३१ चेंडूत ६६ धावांची शानदार खेळी केली, २१२.९० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ४ चौकार आणि ६ लांब षटकार ठोकले. त्याच्या खेळीमुळे भारताला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करण्यास मदत झाली. दुबेच्या या शानदार खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
Highest Score for India in T20WC
(While batting at No.5 or Lower) 66 – 𝗦𝗵𝗶𝘃𝗮𝗺 𝗗𝘂𝗯𝗲 v NED (2026)*
63 – Hardik Pandya v ENG (2022)
58 – Yuvraj Singh v ENG (2007)
52 – Hardik Pandya v NAM (2026)
50* – Rohit Sharma v SA (2007)
50* – Hardik Pandya v BAN (2024)
47 – Axar… pic.twitter.com/px9f3N3LhV — 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) February 18, 2026
या खेळीसह शिवम दुबेने एक मोठा विक्रम देखील रचला. शिवम दुबे आता टी-२० विश्वचषकात ५ व्या किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. यापूर्वी, हा विक्रम हार्दिक पंड्याच्या नावावर जमा होता, ज्याने २०२२ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध ६३ धावा फटकावल्या होत्या. या यादीत युवराज सिंगचे नाव देखील सामील आहे. त्याने २००७ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध ५८ धावांची खेळी केली होती. दुबेच्या या खेळीने त्याला या विशेष यादीत अव्वल स्थानावर पोहचवेल.






