Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NED, T20 World Cup : युवराज-हार्दिकला दिला धोबी पछाड! नेदरलँड्सविरुद्ध शिवम दुबेची आक्रमक खेळी; रचला खास विक्रम 

टी-२० विश्वचषक २०२६ चा ३६ वा सामना १८ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे भारत आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्सचा १७ धावांनी धुव्वा उडवला. भारताकडून शिवम दुबेने शानदार कामगिरी केली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 19, 2026 | 08:29 AM
IND vs NED, T20 World Cup: Dhobi beats Yuvraj-Hardik! Shivam Dubey's aggressive innings against Netherlands; Creates a special record

IND vs NED, T20 World Cup: Dhobi beats Yuvraj-Hardik! Shivam Dubey's aggressive innings against Netherlands; Creates a special record

Follow Us
Close
Follow Us:

Shivam Dubey creates a record in the T20 World Cup : टी-२० विश्वचषक २०२६ चा ३६ वा सामना १८ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे भारत आणि नेदरलँड्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव केला. हा स्पर्धेत भारताचा सलग चौथा विजय होता. नेदरलँड्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ५ गडी गमावून १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल नेदरलँड्स २० षटकांत केवळ १७६ धावाच करू शकला परिणामी संघाला पराभव पत्करावा लागला.

हेही वाचा : IND vs NED, T20 World Cup 2026 : अहमदाबादमध्ये भारतच ठरला ‘किंग! नेदरलँड्स 17 धावांनी उडवला धुव्वा; चक्रवर्तीच्या 3 विकेट्स

भारताच्या या विजयात अष्टपैलू शिवम दुबेने महत्त्वाची भूमिका वठवली. त्याने फलंदाजी करत ६६ धावांची विजयी खेळी खेळली तर गोलंदाजीमध्ये महत्वाच्या २ विकेट्स काढल्या. नेदरलँड्सविरुद्धच्या त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीने त्याने भारतीय दिग्गज युवराज सिंग आणि रोहित शर्मा यांचे विक्रयम मोडीत काढले. त्याने संघातील सहकारी हार्दिक पंड्याला देखील मागे टाकले. शिवम दुबेच्या अनोख्या विक्रमाबद्दल आपण माहिती घेऊया.

एकेकाळी टीम इंडियाने ९ षटकांत ६९ धावा केल्यानंतर महत्वाच्या ३ विकेट गमावल्या होत्या त्यामुळे संघ चांगलाच आढकणीत आला होता. आशा वेळी  शिवम दुबे फलंदाजीसाठी आला आणि त्याने डाव सावरला. त्याने आक्रमक धावा काढण्यास सुरुवात केली. दुबेने फक्त ३१ चेंडूत ६६ धावांची शानदार खेळी केली, २१२.९० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ४ चौकार आणि ६ लांब षटकार ठोकले. त्याच्या खेळीमुळे भारताला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करण्यास मदत झाली. दुबेच्या या शानदार खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Highest Score for India in T20WC
(While batting at No.5 or Lower)
66 – 𝗦𝗵𝗶𝘃𝗮𝗺 𝗗𝘂𝗯𝗲 v NED (2026)*
63 – Hardik Pandya v ENG (2022)
58 – Yuvraj Singh v ENG (2007)
52 – Hardik Pandya v NAM (2026)
50* – Rohit Sharma v SA (2007)
50* – Hardik Pandya v BAN (2024)
47 – Axar… pic.twitter.com/px9f3N3LhV
— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) February 18, 2026

शिवम दुबेने युवराज, रोहित आणि हार्दिकचा विक्रम मोडला

या खेळीसह शिवम दुबेने एक मोठा विक्रम देखील रचला. शिवम दुबे आता टी-२० विश्वचषकात ५ व्या किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. यापूर्वी, हा विक्रम हार्दिक पंड्याच्या नावावर जमा होता, ज्याने २०२२ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध ६३ धावा फटकावल्या होत्या. या यादीत युवराज सिंगचे नाव देखील सामील आहे. त्याने २००७ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध ५८ धावांची खेळी केली होती. दुबेच्या या खेळीने त्याला या विशेष यादीत अव्वल स्थानावर पोहचवेल.

हेही वाचा : Ranji trophy 2026 : जम्मू-काश्मीरने घडवला इतिहास! 67 वर्षांनंतर अंतिम फेरीत मारली धडक; उपांत्य फेरीत बंगालला पाजले पाणी

 

Web Title: Ind vs ned t20 world cup dubey puts yuvraj hardik behind with aggressive innings against netherlands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • Shivam Dube

संबंधित बातम्या

IND vs NED, T20 World Cup : शिवम दुबेने राखली लाज! भारताचे नेदरलँड्ससमोर 194 धावांचे लक्ष्य; लोगन व्हॅन बीक चमकला 
1

IND vs NED, T20 World Cup : शिवम दुबेने राखली लाज! भारताचे नेदरलँड्ससमोर 194 धावांचे लक्ष्य; लोगन व्हॅन बीक चमकला 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.