भारताने नेदरलँड्स १७ धावांनी उडवला धुव्वा(फोटो-सोशल मीडिया)
IND vs NED, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज ३६ वा सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव केला. या विजयासह भारत ग्रुप A मध्ये अपराजित राहिला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ६ गडी गमावून १९३ धावा केल्या. तर नेदरलँड्स संघ २० षटकात ७ विकेट्स गमावून १७६ धावाच करू शकला. भारताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा लागोपाठ तिसऱ्या वेळा शून्यावर बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी ३९ धावांची भागीदारी रचत संघाला सावरले, दरम्यान इशान किशन १८ धावा करून माघारी गेला. त्यानंतर तिलक वर्मा २७ चेंडूत ३१ धावा करून माघारी गेला. कर्णधार सूर्यकुमार यादवने २८ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले. त्यानंतर शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांनी भागीदारी रचत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. शिवम दुबेने ३१ चेंडूत ६६ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ६ षटकार लगावले. तर हार्दिक पंड्या २१ चेंडूत ३१ धावा केल्या आणि संघाचा डाव १९३ धावांपर्यंत पोहचवला. नेदरलँड्सकडून लोगन व्हॅन बीकने ३ विकेट्स घेतल्या. तर आर्यन दत्तने २ विकेट्स घेतल्या. काइल क्लेनने १ विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करणाऱ्या नेदरलँड्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. ३५ धावांवर संघाने आपला पहिला गडी गमावला. मॅक्स ओ’डॉड २० धावा कडून बाद झाला. त्यानंतर नेदरलँड्स संघाच्या विकेट्स जात राहिल्या. मायकेल लेविट २४ धावा, बास डी लीडे ३३ धावा, कॉलिन अॅकरमन २३ धावा करून बाद झाले. भारतीय गोलंदाजांनी नेदरलँड्स संघाला कोणतीच संधी दिली नाही. आर्यन दत्त भोपळा न फोडता माघारी गेला. स्कॉट एडवर्ड्स १५ धावा करून बाद झाला. झॅक लायन-कॅचेट २६ धावा केल्या. नोआह क्रोस २५ धावांवर तर लोगन व्हॅन बीक ४ धावांवर नाबाद राहिले. भारताकडून वरुण चक्रवर्तीने सारवधिक ३ विकेट्स घेतल्या, तर शिवम दुबेने २ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
नेदरलँड्स प्लेइंग इलेव्हन : मायकेल लेविट, मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, कॉलिन अॅकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), झॅक लायन-कॅचेट, नोआह क्रोस, रोएलॉफ व्हॅन डेर मेरवे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, काइल क्लेन
भारत प्लेइंग इलेव्हन : इशान किशन (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह






