Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

भारतीय संघाने दमदार कामगिरी करत  २०२६ च्या टी२० विश्वचषकातील सुपर ८ टप्प्यासाठी पात्रता मिळवली आहे. भारताचा पुढचा सामना बुधवारी नेदरलँड्सविरुद्ध असणार आहे, या सामन्यासाठी भारतीय संघ अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल करू शकतो.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 17, 2026 | 07:41 PM
IND vs NED, T20 World Cup: Surya Army to try new things against Netherlands! Will 'this' player get a chance in the playing XI?

IND vs NED, T20 World Cup: Surya Army to try new things against Netherlands! Will 'this' player get a chance in the playing XI?

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NED,T20 World Cup 2026 : भारतीय संघाने दमदार कामगिरी करत  २०२६ च्या टी२० विश्वचषकातील सुपर ८ टप्प्यासाठी आपले स्थान निश्चित केले. भारतीय संघाने ग्रुप स्टेजमधील तिन्ही सामने जिंकून पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान अधिक बळकट केले. १५ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आलेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानला ६१ धावांनी नमवून जेतेपदासाठी आपला दावा आणखी मजबूत केला. भारताचा पुढचा सामना बुधवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध खेळला जाणार आहे. नेदरलँड्स संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी वेगवेगळ्या कारणांसाठी अधिक महत्त्वाचा असणार आहे.

हेही वाचा : Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी

संघात बदल होण्याची शक्यता

भारताने आधीच सुपर ८ मध्ये स्थानमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन या सामन्यासाठी काही खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता नाकारता येत नाही. सततच्या सामन्यांमुळे प्रमुख खेळाडूंवरचा कामाचा ताण देखील विचारात घेतला जात आहे. परिणामी, बेंचवरील खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. या संदर्भात, सर्वांचे लक्ष स्टार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या पुनरागमनावर असणार आहे. ज्याला या स्पर्धेसाठी अद्याप प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यात आपयश आले आहे.

वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे त्रस्त

वॉशिंग्टन सुंदरला वडोदरा येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान साईड स्ट्रेनचा त्रास झाला होता. या दुखापतीमुळे तो बराच काळ भारतीय संघाचा भाग होऊ शकला नाही. तसेच, तो स्पर्धेच्या सुरुवातीला तो पूर्णपणे बरा होऊ शकला नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवकडून यापूर्वीच असे सूचित करण्यात आले होते की,  सुंदर नामिबियाविरुद्धच्या सामन्यासाठी निवडीसाठी उपलब्ध असणार, परंतु त्या सामन्यातही त्याचा समावेश करण्यात आला नाही. शिवाय, तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात देखील सहभागी झाला नव्हता, ज्यामुळे त्याच्या सामन्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

सध्याच्या संघ संयोजनाकडे पाहता, वॉशिंग्टन सुंदरला स्पिन अष्टपैलू अक्षर पटेलचा बॅकअप म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.  अक्षर पटेलने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली, २४ धावांत दोन विकेट घेतल्या आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती संघात असल्याने, तिसऱ्या फिरकी गोलंदाजाची क्वचितच गरज भासत असल्यामुळे तंदुरुस्त असून देखील वॉशिंग्टनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही.

हेही वाचा : ZIM vs IRE : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पावसामुळे आयर्लंडविरुद्धचा सामना रद्द! झिम्बाब्वेची सुपर 8 मध्ये एंट्री

सुंदरला संधी मिळण्याची दाट शक्यता

तथापि, आता भारत सुपर ८  मध्ये पोहोचला असून संघ व्यवस्थापन संयोजनासह प्रयोग करण्याची शक्यता आहे. हार्दिक पंड्या किंवा शिवम दुबे यांना विश्रांती देण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वॉशिंग्टन सुंदर खेळू शकेल.

Web Title: Ind vs ned t20 world cup will sundar get a chance in indias playing xi against the netherlands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 07:41 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.