झिम्बाब्वेची सुपर 8 मध्ये एंट्री(फोटो-सोशल मीडिया)
ZIM vs IRE, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३२ वा सामना झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात खेळला जाणार होता. पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणाऱ्या या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला, टॉस लवकर होऊ शकला नाही. पाऊस थांबेल या आशेवर टॉस पुढे ढकलण्यात आला, परंतु पावसाचा जोर कायम राहिला त्यामुळे टॉस होऊ शकला नाही, त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यामुळे झिम्बाब्वे संघाने सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवला.
झिम्बाब्वे संघाने सुपर ८ मध्ये प्रवेश केल्याने ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. सामना थेट रद्द झाल्याने दोन्ही संघाना एक एक गुण देण्यात आला आहे. अशाप्रकारे एक गुण मिळवून झिम्बाबे तीन सामन्यात ५ गूणांसह थेट सूपर ८ मध्ये पोहचला आहे. तर आयर्लंडचचे ४ सामन्यात तीन गुण झाले असल्याने ते या स्पर्धेतून बाहेर होणार आहेत.पावसामुळे हा सामना रद्द झाला आणि झिम्बाबे सूपर ८ मध्ये पोहोचला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या उरल्या सूरलेल्या आशा संपुष्ठात आल्या आहेत. ऑस्ट्रेलिया ओमान विरूद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. पण या सामन्यामुळे ते जास्तीत जास्त ४ गुणांपर्यंत पोहोचू शकणार आहेत. त्यामुळे या विजयाचा ऑस्ट्रेलियाला काहीच फायदा होणार नाही आहे आणि ते ग्रुप स्टेजमधूनच बाहेर होणार आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या बाहेर पडल्याने, सुपर ८ मध्ये भारत कोणत्या(आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६)संघांचा सामना करेल हे निश्चित झाले आहे. २२ फेब्रुवारी रोजी, भारतीय संघ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. त्यानंतर, २६ फेब्रुवारी रोजी, सूर्या आणि त्याचे खेळाडू चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झिम्बाब्वेशी दोन हात करतील. शेवटच्या सुपर ८ मध्ये, भारतीय संघ कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजशी सामना करणार आहे.
हेही वाचा : इम्रान खानची अवस्था वाईट! गावस्कर आणि कपिल देवसह 14 माजी क्रिकेटपटूंचे शाहबाज शरीफ यांना पत्र; वाचा सविस्तर
आयर्लंड इलेव्हन: रॉस अडायर, टिम टेक्टर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलानी, मार्क अडायर, बॅरी मॅकार्थी, मॅथ्यू हम्फ्रीज, जोशुआ लिटिल
झिम्बाब्वे इलेव्हन : ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमणी (विकेटकीपर), डिओन मायर्स, सिकंदर रझा (क), रायन बर्ल, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, वेलिंग्टन मसाकादझा, ग्रॅमी क्रेमर, ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड नगारावा






