
IND vs NZ 2nd ODI: New Zealand won the toss and elected to bowl; India will bat first.
IND vs NZ ODI Series : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामान्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना राजकोट येथे खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना बडोदरा येथे खेळला गेला होता. या सामन्यात भारताने ४ विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार मायकेल ब्रेसवेल या सामन्यात भारताला रोखून मालिकेत बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल तर भारतीय संघ आपली विजयी रथ कायन राखून मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर खेळणार आहे.
हेही वाचा : IND vs NZ 2nd ODI: राजकोटमध्ये कोण करणार ‘राज’? आयुष बडोनीच्या जागी ‘या’ खेळाडूची सरप्राईज एंट्री
वडोदरा येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचा भाग राहणार नाही. त्याच्या जागी आयुष बदोनीचा संघात समावेश करण्यात आला होता, परंतु त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही आणि संघ व्यवस्थापनाने अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला.
2nd ODI. New Zealand won the toss and elected to field. https://t.co/x1fEenI0xl #TeamIndia #INDvNZ #2ndODI @IDFCFIRSTBank — BCCI (@BCCI) January 14, 2026
हेही वाचा : अशी फिल्डिंग पाकिस्तानीच करू शकतात! जगभरात पुन्हा नाचक्की, पहिले बाबर-रिझवान आणि आता हसन अली
2nd ODI 🇮🇳XI: S. Gill (c), R. Sharma, V. Kohli, S. Iyer, KL. Rahul (wk), R. Jadeja, N. Kumar Reddy, H. Rana, K. Yadav, M. Siraj, P. Krishna.
https://t.co/x1fEenI0xl #TeamIndia #INDvNZ #2ndODI @IDFCFIRSTBank — BCCI (@BCCI) January 14, 2026
भारताचा प्लेइंग ११ : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
न्यूझीलंडचा प्लेइंग ११ : डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे (यष्टिरक्षक), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅकेरिन फॉल्क्स, ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन, जेडेन लेनोक्स