
IND vs NZ 4th T20I: Abhishek Sharma registers an embarrassing record! He achieved 'this' feat in the fourth T20 match.
Abhishek Sharma’s unwanted record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना काल बुधवारी विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यातन्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २१६ धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु, भारतीय संघ १८.४ षटकात १६५ धावाच करू शकला आणि परिणामी भारताला ५० धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा आपली छाप पाडू शकला नाही. या दरम्यान, त्याच्या नावे एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.
भारताचा अनुभवी फलंदाज अभिषेक शर्मा चौथ्या T20 सामन्यात गोल्डन डकवर माघारी गेला. अभिषेक शर्मा त्याच्या बॅटने विरोधकांमध्ये खळबळ उडवून देतो. मात्र त्याच्या नावे एक नको असलेला विक्रम नोंदवल गेला आहे. अभिषेक शर्मा एका T20 मालिकेत दोन गोल्डन डकचा विक्रम करणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, अभिषेक शर्माला जेकब डफीने गोल्डन डकवर बाद केले होते. तर काल झालेल्या चौथ्या T20 सामन्यात, अभिषेक शर्माला मॅट हेन्रीने सीमारेषेवर गोल्डन डकवर माघारी पाठवले.
हेही वाचा : IND vs NZ 4th T20I : न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या पराभवाला कारणीभूत कोण? ‘या’ खेळाडूंची नावे आघाडीवर
बुधवारी विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या चौथ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ५० धावांनी पराभव केला. पाहिल्या तीन सामन्यात पराभव पत्करावा लागलेल्या न्यूझीलंडने १८.४ षटकांत ७ बाद २१५ धावा केल्या आणि त्यानंतर भारताचा डाव १६५ धावांत गुंडाळला. भारताकडून शिवम दुबेने २३ चेंडूत ६५ धावा केल्या, तर रिंकू सिंगने ३० चेंडूत ३९ धावांचे योगदान दिले परंतु, ते भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने तीन बळी घेतले, तर जेकब डफी आणि ईश सोधीने प्रत्येकी दोन बळी घेतले.
भारताच्या शिवम दुबेने भारतासाठी शानदार फलंदाजी करत एकाकी झुंज देत, संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. दुबेने २३ चेंडूत ६५ धावांची तुफानी खेळी केली, यामध्ये त्याने सात षटकार आणि तीन चौकार मारले. परंतु, टो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.