
IND vs NZ 4th T20I: Who is responsible for India's defeat against New Zealand? These players' names are at the forefront.
IND vs NZ, The players responsible for the defeat in the fourth T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना २८ जानेवारी रोजी विशाखापट्टणम येथील ACA VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ५० धावांनी पराभव करून मालिकेत विजयाचे खाते उघडले. टॉस गामवून प्रथम फलंदाजी करताना किवीज संघाने २१५ धावा केल्या होत्या. परंतु प्रत्युत्तरात भारतीय संघ १६५ धावांवरच गडगडला. भारताच्या या पराभवाच्या मागील नेमकी कारणं कोणती आहेत? याबद्दल माहिती घेऊया.
हेही वाचा : RCB vs UPW, WPL 2026 : RCB समोर अंतिम फेरीचे लक्ष्य! UPW सोबत करावे लागणार दोन हात
भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर माघारी गेल्यानंतर, कर्णधार सूर्यकुमार यादववर डाव सांभाळण्याची जबाबदारी असताना, सूर्या आपली चमक दाखवू शकला नाही. तो ८ चेंडूत फक्त ८ धावा काढून बाद झाला. त्याला जेकब डफीने झेलबाद केले. कर्णधाराचे झटपट बाद होणे संघासाठी चांगलेच माहागडे ठरले.
या मालिकेत भारताचा सलामीवीर संजू सॅमसनची बॅट शांतच राहिली. त्याला काल झालेल्या चौथ्या सामन्यात देखील मोठी खेळी करण्यात अपयश आले. संजू १५ चेंडूत फक्त २४ धावा करून बाद झाला. यावेळी संघाला त्याच्याकडून खूप मोठ्या योगदानाची अपेक्षा होती.
चौथ्या टी-२० सामन्यात हर्षित राणाची कामगिरी बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये समाधानकारक कामगिरी करण्यात यशस्वी झाला नाही. त्याने चार षटकांत ५४ धावा दिल्या. परंतु, त्याला एक देखील विकेट घेता आली नाही. फलंदाजी करताना तो १३ चेंडूत फक्त ९ धावा करून माघारी गेला.
लेग-स्पिनर रवी बिश्नोईला या सामन्यात आपला प्रभाव पाडण्यात अपयश आले. त्याने त्याच्या चार षटकांत ४९ धावा मोजल्या आणि फक्त एकच बळी घेतला. मधल्या षटकांत धावसंख्या रोखण्यात भारताला अपयश आले आणि संघाच्या अडचणीत वाढ झाली.
या सर्वांच्या खराब कामगिरीनंतर देखील शिवम दुबेने भारतासाठी शानदार फलंदाजी करत एकाकी झुंज देत, संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. दुबेने २३ चेंडूत ६५ धावांची तुफानी खेळी केली, यामध्ये त्याने सात षटकार आणि तीन चौकार मारले. परंतु, टो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.