
IND vs NZ 5th T20I: Suryakumar Yadav will make history as captain! He will create a record with a single six.
Suryakumar Yadav will make history in the IND vs NZ 5th T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत भारताने 3-1 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील आज होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडचा पराभव करून मालिकेत 4-1 असा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सूर्यकुमार यादव उत्कृष्ट फॉर्ममध्ये परतला आहे. मात्र, त्याला विशाखापट्टणममधील चौथ्या T20I मध्ये, फक्त 8 धावाच करता आल्या होत्या. आता, तिरुवनंतपुरममध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील शेवटचा सामना असल्याने, सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा सूर्याकडे असणार आहेत. कारण तो या सामन्यात त्याला दोन विक्रम रचण्याची संधी चालून आली आहे.
सूर्यकुमार यादवने T20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 199 षटकार ठोकले आहेत. याचा अर्थ असा की त्याला हा टप्पा गाठण्यासाठी फक्त एक षटकाराची आवश्यकता आहे. जर त्याने तिरुअनंतपुरममध्ये एक देखील षटकार लागावला तर तो चौथ्या क्रमांकावर २०० षटकार मारणाऱ्या निवडक फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे.
कर्णधार म्हणून रचेल विक्रम
सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून आपली छाप पाडताना दिसत आहे. सध्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून त्याच्या नावावर ४९ षटकार जमा आहेत. त्याने आणखी एक षटकार जर लगावला तर तो कर्णधार म्हणून ५० षटकार पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.
चौथ्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर देखील सूर्यकुमार यादव संपूर्ण मालिकेत बळकट दिसून आला आहे. त्याने आतापर्यंत चार डावांमध्ये १७९ धावा काढल्या आहेत. ज्यामध्ये २१ चौकार आणि ८ षटकार लगावले आहे. ज्यामुळे तो मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. या यादीत त्याच्या पाठोपाठ अभिषेक शर्मा आहे, ज्याने चार सामन्यांमध्ये १५२ धावा फटकावल्या आहेत.
तिरुअनंतपुरममध्ये षटकारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. चौथ्या टी-२० मध्ये आपली छाप न पाडू शकेलेला भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव अंतिम सामन्यात पुन्हा एकदा गर्जना करण्याची शक्यता आहे. स्कूप्स, फ्लिक आणि ३६० अंश शॉट्ससह त्याची खेळण्याची शैली त्याला कोणत्याही गोलंदाजासाठी अधिक घटक ठरवते.