
IND vs NZ 5th T20I: Sanju Samson's future will be decided in Thiruvananthapuram! India will be aiming for a 4-1 series victory against New Zealand.
IND vs NZ 5Th 20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना आज तिरुवनंतपुरम येथे खेळला जाणार आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी जोरदार लय पकडलेल्या भारतीय संघासाठी न्यूझीलंडविरुद्धचा पाचवा आणि अखेरचा टी-२० औपचारिकतेपुरता नसणार आहे. आज ग्रीनफिल्ड स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात संजू सॅमसनची फलंदाजीतील फॉर्म आणि अष्टपैलू अक्षर पटेलची फिटनेस ही दोन मोठी लक्षवेधी मुद्दे असतील.
भारताने मालिका आधीच खिशात घातली असली तरी ४-१ असा दमदार विजय आत्मविश्वास अधिक वाढवणारा ठरेल. विशाखापत्तनम येथे झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने प्रयोग करत पाच प्रमुख गोलंदाजांनाच खेळवले होते. हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांच्याकडून गोलंदाजी करून घेतली नव्हती. तो सामना भारत हरला, पण मालिकेच्या निकालावर त्याचा परिणाम झाला नाही.
हेही वाचा : Ireland vs UAE : पॉल स्टर्लिंगचा हिटमॅनला शोबी पछाड! मोडला रोहित शर्माचा ‘तो’ विश्वविक्रम
मात्र, संघ व्यवस्थापन पुन्हा एकदा गोलंदाजी विभागात बदल करू शकते. मागील दोन सामन्यांत विश्रांती दिलेल्या ‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्तीला संधी मिळण्याची शक्यता आहे. फलंदाजी विभागात फारसे बदल अपेक्षित नसले तरी संजू सॅमसनकडे सर्वांचे लक्ष असेल.
निर्भीड फलंदाजीसाठी ओळखला जाणारा सॅमसन या मालिकेत धावा करण्यात झगडताना दिसला आहे. फॉर्मपेक्षा त्याच्या तांत्रिक कमतरतेची चिंता अधिक आहे, ज्याचा आत्मविश्वासावरही परिणाम होत आहे. मात्र, आपल्या गृह मैदानावर आणि चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे तो पुन्हा लय पकडेल, अशी अपेक्षा आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओतून केरळमध्ये सॅमसनची लोकप्रियता स्पष्ट दिसली.
सॅमसनसाठी ईशान किशन हा मजबूत पर्याय उपलब्ध आहे. त्याने मालिकेत प्रभावी कामगिरी केली असली तरी अज्ञात दुखापतीमुळे तो मागील सामन्यात खेळू शकला नव्हता. दुसरीकडे, नागपूरमधील पहिल्या सामन्यात बोटाला दुखापत झाल्यापासून अक्षर पटेल मैदानाबाहेर आहे. चौथ्या सामन्यापूर्वी त्याने नेट्समध्ये गोलंदाजी केली होती, त्यामुळे त्याच्या पुनरागमनाची शक्यता तपासली जाईल. न्यूझीलंड संघालाही हा सामना जिंकून आत्मविश्वास वाढवायचा आहे.
पहिल्या तीन सामन्यांत भारतीय आक्रमणासमोर ते हतबल दिसले, पण चौथ्या सामन्यात त्यांनी भारताच्या प्रमुख फलंदाजांवर लगाम घातला. ग्रीनफिल्ड स्टेडियमवर धावांचा पाऊस पडतो, त्यामुळे येथे रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे. किवी कर्णधार मिचेल सेंटनरप्रमाणे, भारताला हरवण्यासाठी काय करावे लागते, हे आता न्यूझीलंडला उमगले आहे आणि त्यामुळेच हा सामना अधिक रोमहर्षक ठरणार आहे.
हेही वाचा : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! दोन मॅचविनर खेळाडू झाले T20 World Cup 2026 मधून बाहेर, निवडकर्त्यांनी केली घोषणा
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, इशान किशन, रवी बिश्नोई.
न्यूझीलंड : मिचेल सेंटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, जॅक फोक्स, मेंट हेन्री, काइल जेमिसन, बेवन जेकब्स, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन.