फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
Champion Trophy 2025 Final Match India vs New Zealnad : भारताचा संघ आज न्यूझीलंडविरुद्ध फायनलचा महामुकाबला करणार आहे. यासाठी क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. सोशल मीडियावर चॅम्पियन ट्रॉफीचे जेतेपद कोणाच्या नावावर होणार याचा तर्कवितर्क लावला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कमालीची कामगिरी केली आहे त्याचबरोबर भारताच्या संघाला चार आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये नेणार रोहित शर्मा हा एकमेव कर्णधार आहे. याचदरम्यान २०२५ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रोहित शर्माचा कर्णधार म्हणून शेवटचा आयसीसी स्पर्धा ठरू शकतो. यानंतर रोहित शर्मा निवृत्तीची घोषणा करू शकतो अशी अटकळ होती.
RCB सह हे तीन संघ WPL 2025 मधून बाहेर, या टीम खेळणार प्लेऑफमध्ये, वाचा गुणतालिकेचं गणित
अंतिम सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत उपस्थित असलेला उपकर्णधार शुभमन गिलने या अफवांचे खंडन केले. गिल म्हणाले होते की रोहितच्या निवृत्तीबद्दल अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. सर्वांचे लक्ष आता सामना जिंकण्यावर आहे. जर भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकला तर तो एकाच वेळी अनेक महत्त्वाचे विक्रम आपल्या नावावर करेल. जर भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तर तो महेंद्रसिंग धोनीनंतर आयसीसीच्या दोन ट्रॉफी जिंकणारा दुसरा भारतीय कर्णधार बनेल. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ३ आयसीसी ट्रॉफी जिंकल्या.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ चा टी-२० विश्वचषक जिंकला. यानंतर, माहीच्या नेतृत्वाखाली, संघाने २०११ चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला. गेल्या वर्षी रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक जिंकला. आता रोहितला त्याची दुसरी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला. याशिवाय, सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा संयुक्त विजेता (श्रीलंकेसह) ठरला.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत ५५ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि त्यापैकी ४१ सामने जिंकले आहेत. या काळात संघाने १२ सामने गमावले आणि १ सामना बरोबरीत सुटला आणि १ अनिर्णीत राहिला. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ७९ सामने खेळले आणि त्यापैकी ४२ सामने जिंकले. अशा परिस्थितीत रोहित शर्माला द्रविडची बरोबरी करण्याची संधी आहे. रोहितला भारताचा पाचवा सर्वात यशस्वी कर्णधार बनण्याची संधी आहे.