IND vs NZ Final: Yuzvendra Chahal in love again? He was seen holding the hand of a mystery girl while watching the final match
IND vs NZ Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 252 धावांचे आव्हान ठेवले आहे. दुबईमध्ये हा सामना खेळला जात आहे. या मॅचमध्ये युजवेंद्र चहलही मॅच पाहताना दिसून आला आहे. पण, यावेळी तो एका मिस्ट्री गर्लसोबत स्टँडवर बसलेला दिसला आहे. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होता आहे. त्यामुळे चहलसोबत स्टेडियममध्ये बसलेली ती मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. चला जाणून घेऊया.
फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. चहल आणि धनश्री दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. दोघेही काही काळ वेगळे राहत असल्याची माहिती समोर आली होती. आता युजवेंद्र चहल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो एका मुलीसोबत स्टँडवर बसून सामना बघताना दिसून आला आहे. तो नेमक्या कोणत्या मुलीसोबत बसला आहे?, ती त्याची मैत्रीण आहे की अजून काही? असे प्रश्न चाहते सोशल मीडियावर आता विचारू लागले आहेत. धनश्री वर्मापासून वेगळा झाल्यानंतर चहल पुन्हा प्रेमात पडला आहे की काय? यातच तो मुलीला डेट करत असल्याचा अंदाज देखील चाहते लावू लागले आहेत.
RJ mahvesh. https://t.co/nlZ7xcwwOx
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) March 9, 2025
स्टँडमध्ये युजवेंद्र चहलसोबत बसलेली ती मुलगी एक प्रभावशाली यूटयूबर आहे. ती रेडिओ जॉकी सुद्धा आहे. आरजे महवाश असे त्या मुलीचे नाव असून यापूर्वीही ती युझवेंद्र चहलसोबत दिसून आली होती. त्यावेळी देखील या दोघांचा एकत्र फोटो पाहून लोकांनी असाच काहीसा अंदाज लावला होता की चहल धनश्री वर्मापासून वेगळा झाल्यानंतर आरजे महवाशला तो डेट करत आहे. मात्र, त्यानंतर महवाशने तिच्या इन्स्टाग्रामवर या बातम्यांचे खंडन केले होते.
हेही वाचा : Ind Vs New : टीम इंडियाने सोडले तब्बल ११ कॅच, फील्डिंगचे तीनतेरा
क्रिकेटर चहल आणि आरजे महवेशकडून इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये दोघेही एकाच अँगलमधून लिहिताना दिसत आहेत. त्यांच्या दोन्ही व्हिडिओंच्या पार्श्वभागावर ओळीवर सर्व लिहिलेले दिसून येत आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 252 धावांचे आव्हान ठेवले आहे. डॅरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेल यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर 7 विकेट्स गमावून न्यूझीलंड 251 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताकडून कुलदीप यादवसह वरुन चक्रवर्तीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर जाडेजा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक विकेट मिळवली आहे. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर करायची असेल तर 252 धावांचे आव्हान पेलावे लागणार आहे.