

शुभमन गिल अन् यशस्वी जयस्वालची आयसीसी रॅंकिंगमध्ये भरारी
जसप्रीत बुमराहने देखील मारली मोठी झेप
भारत अन् न्यूझीलंड टेस्ट सिरीजचा झाला फायदा
IND Vs NZ: नुकतीच भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज सुरू आहे. त्यातील पहिला सामना संपला आहे. पहिला सामना ड्रॉ झाला आहे. मात्र भारतीय संघाच्या खेळाडूंना आयसीसीच्या रॅंकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. कर्णधार शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि जसप्रीत बुमराहला मोठा फायदा झाला आहे. ही सिरीज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारतासाठी महत्वाची समजली जात आहे.
भारत-न्यूझीलंडमधील पहिल्या टेस्टनंतर आयसीसीने क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारताच्या खेळाडूंचा मोठा फायदा झाला आहे. वेलिंगटन येथे पार पडलेल्या ड्रॉ सामन्यात केलेल्या चांगल्या कामगिरीचा फायदा शुभमन गिल, जयस्वाल आणि बुमराहला झाला आहे. ऋषभ पंतचा देखील यात समावेश आहे.
IND vs NZ: गिल भाई थेट नाचायलाच लागला राव! DRS बरोबर आला अन् Video Viral
न्यूझीलंडविरुद्ध भारताने 720 रन्सचा डोंगर उभा केला. यामध्ये कर्णधार गिल, जयस्वाल आणि ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराहला क्रमवारीत फायदा झाला आहे. पहिल्या इनिंगमध्ये पंतने शतक केले. त्याने 744 पॉईंट्ससह 6 व्या स्थानी झेप घेतली. तर यशस्वी जयस्वाल पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. तर केएल राहुलने देखील थेट 25 व्या तर देवदत्त पडीकलने 39 व्या स्थानावर उडी मारली आहे.
आयसीसीने गोलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. पहिल्या कसोटीत बुमराहने तब्बल 5 विकेट घेतल्या आहेत. तर त्याने आयसीसी क्रमवारीत इंग्लंडच्या ऑली रॉबिन्सनसह संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ऋषभ पंत, कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुलने मोठी झेप घेतली आहे. ऋषभ पंत याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. कर्णधार शुभमन गिल याने दोन पॉईंट्सची प्रगती केली आहे. न्यूझीलंडचा फलंदाज रचिन रवींद्र याला दोन स्थानांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
IND Vs NZ: '... आधीच थोडासा अंदाज होता'; मॅच ड्रॉ अन् शुभमन गिलने केले मोठे भाष्य
पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुल. यशस्वी जयस्वाल, कर्णधार शुभमन गिल , शतकवीर ऋषभ पंत यांनी मोठी आक्रमक खेळी करत न्यूझीलंडविरुद्ध 720 रन्सचा डोंगर उभा केला होता. मात्र भारताला हा सामना जिंकणे शक्य झाले नाही. हा सामना ड्रॉ झाला आहे. आता दुसऱ्या सामन्यात कोण जिंकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कोण जिंकला?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित (ड्रॉ) राहिला.
आयसीसी रँकिंगमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंना फायदा झाला?
पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय कर्णधार शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना आयसीसी रँकिंगमध्ये फायदा झाला.