
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
India Under 19 vs New Zealand Under 19 : अंडर-१९ विश्वचषक २०२६ आता शेवटच्या टप्प्यात आहे. भारताच्या संघाने या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. भारताने पहिल्या सामन्यामध्ये यूएसला पराभूत केले तर दुसऱ्या सामन्यामध्ये बांग्लादेशला पराभूत करुन सुपर 6 मध्ये प्रवेश केला. २०२६ चा अंडर-१९ विश्वचषक झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे आयोजित केला जात आहे. भारत अंडर-१९ आणि न्यूझीलंड अंडर-१९ हे संघ २४ जानेवारी रोजी एकमेकांसमोर येतील.
भारतीय संघाने आतापर्यंत विश्वचषकात दोन सामने खेळले आहेत. पहिला सामना अमेरिकेविरुद्ध होता, जिथे त्यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर भारताने बांगलादेशला हरवले. भारतीय संघ आता तिसरा सामना खेळणार आहे. चला सामन्याच्या प्रमुख तपशीलांवर एक नजर टाकूया.
भारत विरुद्ध न्यूझीलंड अंडर-१९ विश्वचषक २०२६ सामना २४ जानेवारी रोजी दुपारी १:०० वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर थेट पाहता येईल. हा सामना जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर देखील थेट प्रक्षेपित केला जाईल.
भारताच्या १९ वर्षांखालील संघ: आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू, हरवंश पंगालिया, कनिष्क चौहान, खिलन पटेल, मोहम्मद एनान, हेनिल पटेल.
न्यूझीलंड अंडर-१९ संघ: टॉम जोन्स (कर्णधार), मार्को विल्यम अल्पे, ह्यूगो बोग, हॅरी बर्न्स, मेसन क्लार्क, जेकब कॉटर, आर्यन मान, ब्रँडन मॅटझोपोलोस, फ्लिन मोरे, स्नेहित रेड्डी डेव्हिरेड्डी, कॅलम सॅमसन.
भारताच्या १९ वर्षांखालील आणि न्यूझीलंडच्या १९ वर्षांखालील संघांमध्ये आतापर्यंत एकूण १८ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने १५ सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने ३ सामने जिंकले आहेत. हेड-टू-हेड स्पर्धेत भारताचा वरचष्मा आहे.
वैभव सूर्यवंशी सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ६७ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७२ धावा केल्या. याआधी त्याने दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत १२७ धावा केल्या. त्यामुळे चाहत्यांच्या नजरा वैभववर असतील.