
IND vs NZ: Virat Kohli created history in Rajkot! Achieved 'this' special feat against New Zealand.
Virat Kohli has made history : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील दूसरा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत ७ बाद २८४ धावा केल्या आहेत. दरम्यान, जगातील नंबर १ वनडे फलंदाज असणाऱ्या विराट कोहलीने पुन्हा एकदा क्रिकेट इतिहास रचला आहे. या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान पटकावला आहे.
राजकोटमधील या सामन्यापूर्वी, कोहलीला महान सचिन तेंडुलकरचा १७५० धावांचा विक्रम मोडण्यासाठी केवळ एका धावेची आवश्यकता होती. विराट कोहलीने पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ख्रिश्चन क्लार्कला शानदार चौकार मारून हा ऐतिहासिक पराक्रम आपल्या नावे केला आहे. या एकाच शॉटने कोहलीने भारतीय क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा विक्रम रचला आहे.
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडविरुद्ध भारतासाठी ४२ एकदिवसीय सामन्यांमध्ये १७५० धावा केल्या आहेत. विराट कोहलीने फक्त ३५ एकदिवसीय सामन्यांमध्ये हा कारनाम केला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने घेतलेली एक धाव ही आता त्याला भारत आणि न्यूझीलंडमधील एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनवून गेली आहे. या यादीमध्ये विराट कोहलीच्या जवळपास अद्याप कोणीही नाही. सचिन तेंडुलकरने १,७५० धावा केल्या होत्या, परंतु तो १२ वर्षांपूर्वीच निवृत्त झाला होता. सध्या या यादीमध्ये फक्त केन विल्यमसन आणि रोहित शर्मा असून त्यानंतर इतर सर्व फलंदाज निवृत्त झाले आहेत.
हेही वाचा : WPL 2026 : हरमनप्रीत कौरने घडवला इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारी ती ठरली जगातील पहिलीच खेळाडू
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज रिकी पॉन्टिंगच्या नावे न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय सामन्यांचा विक्रम जमा आहे. पॉन्टिंगने १९९५ ते २०११ पर्यंत ब्लॅक कॅप्सविरुद्ध ५१ एकदिवसीय सामने खेळले असून ५० डावांमध्ये एकूण १,९७१ धावा फटकावल्या आहेत. हा टप्पा ओलांडण्यासाठी आणि नंबर १ स्थानावर पोहोचण्यासाठी विराट कोहलीला आणखी २१८ धावा कराव्या लागणार आहेत.